Election : घोडगंगा निवडणूक आखाड्याचा जोर शिगेला

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक आखाडा सध्या आरोप - प्रत्यारोपांनी फेऱ्यांनी गाजत आहे.
Ghodganga Sugar Factory
Ghodganga Sugar FactoryAgrowon

शिरूर, जि.पुणे : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा (Ghodganaga Sugar Mill) निवडणूक (Election) आखाडा सध्या आरोप - प्रत्यारोपांनी फेऱ्यांनी गाजत आहे. या रणधुमाळीत जुन्या जाणत्यांच्या मार्मिक टिपण्ण्यांसह 'फायरब्रॅण्ड' नेत्यांच्या घणाघाती टीकांनी निकराचा संघर्ष पेटल्याने ऐन थंडीत शिरूर तालुक्यातील वातावरण तापले आहे.

Ghodganga Sugar Factory
Sugar Mill : ‘भीमा’ च्या सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन ५० रुपयांचा हप्ता जमा

'ब' वर्ग मतदार संघातील एक जागा बिनवरोध झाली असून, उर्वरित वीस जागांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल व भाजपसह विरोधकांच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनेलमध्ये चुरस होणार, असे सध्याचे चित्र आहे. आजपासून प्रचाराला अवघे पाच दिवस मिळणार असल्याने दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांसह पॅनेल प्रमुख व समर्थक पदाधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करत आहेत. दिवसभर गावभेटीच्या निमीत्ताने नेते आणि कार्यकर्त्यांचे झंझावाती दौरे सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत वाड्या - वस्त्यांवर गुप्त बैठका झडत आहेत.

Ghodganga Sugar Factory
Sugar Stock : साखरसाठ्याची अपूर्ण माहिती दिल्यास कोटा रोखू

अध्यक्षपदाच्या माध्यमातून, गेले २५ वर्षे कारखान्यावर एकहाती सत्ता राखणाऱ्या आमदार ॲड. अशोक पवार यांच्यासमोर विरोधकांनी जोरदार आव्हान उभे केले आहे. आमदार पवार यांच्या प्रचारयंत्रणेत राष्ट्रवादीच्या जिगरबाज कार्यकर्त्यांची तडाखेबंद फौज दिसत असताना विरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांची एकत्र बांधलेली मोट देखील नेटाने किल्ला लढवताना दिसत आहे. विरोधी पॅनेलची धूरा सांभाळणारे, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, संचालक सुधीर फराटे, माजी ज्येष्ठ संचालक पांडुरंगअण्णा थोरात यांनी काही काळ आमदार पवार यांच्यासोबत कारखान्यात संचालक म्हणून काम केल्याने ते देखील मुद्दे तापविण्यात आघाडीवर आहेत.

कर्जावरून आरोप-प्रत्यारोप

घोडगंगा कारखान्यावरील कर्ज हा दोन्ही बाजूंच्या प्रचारातील कळीचा मुद्दा ठरत आहे. कारखान्यावर साडेचारशे कोटीचे कर्ज असल्याचा व त्यास गेले २५ वर्षे अध्यक्ष असलेल्या अशोक पवारांचा कारभारच जबाबदार असल्याचा आरोप करीत विरोधकांनी केला आहे. याकरिता कारखान्याच्या अहवालाचा आधार घेतला आहे.

तर, आमदार पवार यांनी कारखान्यावरील कर्जाचे आरोप स्पष्ट शब्दांत टोलवून लावले आहेत. विरोधकांनी कारखान्यावरील कर्जाची नीट माहिती घ्यावी. आपली संस्था कर्जबाजारी असल्याचे सांगून संस्थेची बदनामी करू नये. कर्जाबाबत समोरासमोर चर्चेची तयारी आहे. कारखान्यावर साडेचारशे कोटीचे कर्ज असल्याचे विरोधकांनी सिद्ध केले तर मी राजकारण सोडून घरी बसेल. मात्र, कर्जबाजारीपणाचा कारखान्यावर केलेला आरोप खोटा निघाल तर विरोधक राजकारण सोडतील का, असा खडा सवाल त्यांनी केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com