Udhhav Thackeray : सर्वांच्या साथीने भविष्यातील आव्हानांचा सामना शक्य

Shivsena UBT : राज्याच्या दौऱ्यावर निघालेल्या श्री. ठाकरे यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात विदर्भातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथून केली.
Udhhav Thackeray
Udhhav Thackeray Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : ‘‘माझ्याकडे धनुष्यबाण चिन्ह नसले तरी तुम्ही सोबत आहात. तुमच्याच बळावर मला यापुढील आव्हाने सर करता येतील. त्यामुळे तुमची साथ सदैव राहू द्या,’’ अशी भावनिक साद माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना (ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.८) घातली.

Udhhav Thackeray
Udhhav Thackeray : थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या : ठाकरे

राज्याच्या दौऱ्यावर निघालेल्या श्री. ठाकरे यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात विदर्भातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथून केली. रविवारी सुरुवातीला त्यांनी जगदंबा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर सेवालाल मंदिरात जात तिथेही त्यांनी माथा टेकला.

Udhhav Thackeray
Udhhav Thackeray : संकटकाळात गडाख यांची साथ जीवनाला ऊर्जा देणारी : उद्धव ठाकरे

सेवालाल महाराज मंदिरात संत कबीरदास महाराज यांनी त्यांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार केला. रामराव महाराज समाधिस्थळी संत शेखर महाराज यांनी त्यांचे स्वागत केले. या ठिकाणी त्यांनी नगारा देखील वाजविला. संत बाबनलाल महाराज संस्थानात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

ठाकरे म्हणाले, ‘‘माझ्याकडे आज शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह नसले तरी तुमच्या सर्वांची साथ कायम राहिल्यास पुढील सगळी आव्हाने पार करता येणे शक्य आहे. त्यामुळेच मी माझ्या दौऱ्याची सुरुवात विदर्भातील पोहरादेवी इथून करत आहे.’’

युवकांची मोठी गर्दी

बाबनलाल संस्थानाच्या वतीने सुनील महाराज यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी श्री. ठाकरे यांना पाहण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती. खासदार विजय राऊत, आमदार नितीन देशमुख, वाशीमचे जिल्हाप्रमुख सुधीर कव्हर, सुरेश मापारी, अनिल राठोड, संजय देशमुख, किशोर राठोड, राजू नाईक यावेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com