Udhhav Thackeray : संकटकाळात गडाख यांची साथ जीवनाला ऊर्जा देणारी : उद्धव ठाकरे

संकटकाळात यशवंतराव गडाख यांची साथ जीवनाला ऊर्जा देणारी आहे. राजकारणाच्या पलीकडे आमचे असलेले जिवाभावाचे नाते असेच जपले जाईल.
Udhhav Thackeray
Udhhav ThackerayAgrowon
Published on
Updated on

Nagar News : संकटकाळात यशवंतराव गडाख यांची साथ जीवनाला ऊर्जा देणारी आहे. राजकारणाच्या पलीकडे आमचे असलेले जिवाभावाचे नाते असेच जपले जाईल. लढवय्या सैनिक माझ्या सोबतीला दिल्याबद्दल दीड वर्षापासून ज्येष्ठ नेते गडाखांची भेट घेऊन आभार मानायचे होते. आज तो योग जुळून आला,’’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Udhhav Thackeray
Udhhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करा

जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता. १२) त्यांच्या सोनई येथील निवासस्थानी भेट घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी शारदाताई गडाख, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यादेखील उपस्थित होत्या.

Udhhav Thackeray
Udhhav Thackeray : थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या : ठाकरे

माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह गडाख परिवाराने उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. गडाख आणि ठाकरे यांच्यात सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निकालावर चर्चा झाली. ‘‘न्यायालयीन संघर्ष मीसुद्धा अनुभवला असल्याने, खचून न जाता अधिक जोमाने काम सुरूच ठेवा,’’ असे गडाख यांनी ठाकरे यांना सांगितले.

ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. १२) नगर जिल्ह्याचा धावता दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे सपत्निक दर्शन घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com