Sugarcane Rate : ऊसदरासाठी शेतकरी संघटना एकत्र

येत्या २३ ऑक्टोबरला पंढरपुरात ऊसपरिषद घेऊन अपेक्षित ऊसदराची मागणी करणार आहेत. पंढरपुरातील शिवाजी चौकात ही ऊस परिषद होईल.
Sugarcane Rate
Sugarcane RateAgrowon

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी सर्वच साखर कारखानदार एकत्र येतात आणि ऊसदर ठरवतात. ऊसदराच्या या प्रश्नांवर कारखान्यांचे अध्यक्ष आपला राजकीय पक्ष, गट, संघटना विसरतात, मग शेतकरी या प्रश्नांवर एकत्र का येऊ शकत नाहीत, अशी भावना घेऊन जिल्ह्यातील स्वाभिमानी, बळीराजा, जनहित, जनशक्तीसह विविध शेतकरी संघटना (Shetkari Sanghtna Solapur) एकत्र आल्या असून, ऊसदर संघर्ष समितीची (Usdar Sangharsh Committee) स्थापना केली आहे.

Sugarcane Rate
Crop Damage : पावसाचे द्राक्ष बागांवर ग्रहण

येत्या २३ ऑक्टोबरला पंढरपुरात ऊसपरिषद घेऊन अपेक्षित ऊसदराची मागणी करणार आहेत. पंढरपुरातील शिवाजी चौकात ही ऊस परिषद होईल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष माऊली हळणवर, बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख दीपक भोसले, जिल्हाध्यक्ष सुहास पाटील, सुभाष मस्के यांनी एकत्र येत पंढरपुरात यासंबंधी एक बैठक घेत याची घोषणा केली.

या बाबत हळणवर म्हणाले, की कारखानदार शेतकऱ्यांचा ऊस दर ठरवताना एकत्र येऊन स्पर्धा न करता ऊस दर ठरवतात, त्यावेळी आपले पक्ष, गट ही सर्व बंधने बाजूला ठेवून एका आईची लेकरं असल्यासारखी वागतात, मग आम्ही का दूर राहावं, आमच्या सर्वांचा उद्देश एकच आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. आता हवा तो दर घेऊच, असेही ते म्हणाले.

या बाबत स्वाभिमानीचे सचिन पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सर्व संघटना ज्यांचा मूळ हेतू हा शेतकऱ्यांच्या उसाला दर मिळवून देणे असाच आहे, तरीही वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन केल्यामुळे पाहिजे तेवढी झळ कारखानदाराला पोहोचत नाही आणि शेतकऱ्यांना घामाचा दाम मिळत नाही, या सर्व गोष्टीचा विचार करून चळवळीतील सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्र येण्याचा विचार केल्याचे सांगितले.

पहिल्या उचल किती, यावर निर्णय...

बळीराजा शेतकरी संघटनेचे दीपक भोसले म्हणाले, आता आम्ही ऊस दर संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून ऊस पिकाचा वाढलेला उत्पादन खर्च कारखानदाराकडून सुरू असलेली शेतकऱ्याची पिळवणूक रिकव्हरी चोरी, काटामारी, जाहीर केलेला दर न देणे इत्यादी प्रश्नावर चर्चा तर होईलच. पण यंदाच्या हंगामामध्ये पहिली उचल किती असावी, यावर निर्णय होईल, असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com