Fodder Shortage : नगरमधील शेतकऱ्यांना करणार एक कोटीचे चारा बियाण्यांचे वाटप

Drought Condition : अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा टंचाई निवारणासाठी पशुसंवर्धन विभागाने चारा उत्पादनासाठी नियोजन केले आहे.
Fodder
Fodder Agrowon
Published on
Updated on

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच पोळा कोरडा गेल्याने चिंता वाढली आहे. दुष्काळजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा टंचाई निवारणासाठी पशुसंवर्धन विभागाने चारा उत्पादनासाठी नियोजन केले आहे. त्यानुसार पाणी उपलब्ध असलेल्या भागातील शेतकऱ्यांना मोफत चारा बियाणे दिले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यातून २ हजार ३९४ हेक्टरवर १ लाख ६० हजार टन चारा उपलब्ध आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Fodder
Nashik Drought : सिन्नरच्या दुष्काळ स्थितीची आदित्य ठाकरेंकडून पाहणी

नगर जिल्ह्यात पाऊस नसल्याने खरिपातील बहुतांश पिके वाया गेलीच आहेतच, पण पाऊस नसल्याचे गंभीर परिणाम पशुधनावरही होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर जिल्ह्यात ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत १३ लाख ३७ हजार २०७ टन चारा उपलब्ध आहे. जिल्ह्याला महिन्याला आठ लाख टन चारा लागतो. त्यामुळे उपलब्ध चारा केवळ सव्वा ते दीड महिना पुरेल.

पाऊस न झाल्यास गंभीर चारा टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात गाय, म्हैस वर्गातील १६ लाख जनावरे आहेत. त्यात पावणे तीन लाख वासरे असून १३ लाख २३ हजार मोठी जनावरे आहेत. सुमारे पावणे पंधरा लाख शेळ्या-मेंढ्यांची संख्या आहे. याशिवाय, गाढव, घोड्यांची संख्या वेगळी आहे.

Fodder
Chara Chavani : जुन्नरच्या पूर्व भागात चाराटंचाई ; चारा छावणी सुरू करण्याची मागणी

ज्या पशुधनाची, दुभत्या जनावरांची संख्या अधिक आहे, अशा कोपरगाव, राहाता, राहुरी, संगमनेर भागांत चाऱ्याची उपलब्धताही कमी आहे. श्रीगोंदा, नेवासा, संगमनेर तालुक्यांत, तर २० दिवस पुरेल एवढाच चारा आहे. त्यामुळे चारा टंचाई गंभीर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह प्रशासनालाही प्राधान्याने अन्य पिकांपेक्षा चारा उत्पादनाला प्राधान्य द्यावे लागणार आहे.

पाऊस नसल्याने चाऱ्याची टंचाई भासणार असल्याने पशुसंवर्धन विभागाने चारा उत्पादनाचे नियोजन केले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीने एक कोटी रुपये चारा बियाणे खरेदीसाठी दिले आहे. धरण क्षेत्रात तसेच पाणी उपलब्ध असलेल्या भागात चारा उत्पादन घेतले जाणार आहे. जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून मागील महिन्यात चारा बियाणे मिळण्यासाठी अर्ज मागवले होते. त्यानुसार १६ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.

दीड लाख टन चारा उत्पादन अपेक्षित

नगर जिल्ह्यात चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना चारा बियाणे वाटप केले जाणार असून त्यात आफ्रिकन टॉल मक्याचे ३३३४० किलो, ॲडव्हंटा मक्याचे २० हजार किलो व शुगर ग्रेस (गोड ज्वारी) चे ९ हजार ९० किलो बियाणे वाटप केले जाणार आहे. आफ्रिकन टॉल व ॲडव्हंटा मक्याचे एकरी ३०किलो बियाणे लागते.

आफ्रिकन टॉल मक्याची एकदाच १०० ते १०५ दिवसात व ॲडव्हंटा मक्याची ८० ते ८५ दिवसांत कापणी होऊन एकरी १७ ते २० टन उत्पादन निघते. शुगर ग्रेस (गोड ज्वारी) चे एकरी पाच किलो बियाणे लागते. या चारा पिकाची तीन वेळा कापणी होते. पहिली कापणी ६० ते ७० दिवसात तर दुसरी व तिसरी कापणी प्रत्येकी ३० ते ४६ दिवसांत होते. नगर जिल्ह्यात यंदा २ हजार ३९४ हेक्टरवर १ लाख ६० हजार टन चारा उपलब्ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com