Nashik Drought : सिन्नरच्या दुष्काळ स्थितीची आदित्य ठाकरेंकडून पाहणी

Aditya Thackeray : ओझर शिर्डी महामार्गावरील हिवरगाव कोमलवाडी (ता. सिन्नर) येथील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवाच्या बांधावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेतकरी कुटुंबाशी संवाद साधला.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Agrowon
Published on
Updated on

Nashik News : ओझर शिर्डी महामार्गावरील हिवरगाव कोमलवाडी (ता. सिन्नर) येथील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवाच्या बांधावर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेतकरी कुटुंबाशी संवाद साधला.

शेतकरी बांधवांना स्वतःची दुष्काळाची व्यथा मांडताना रडू कोसळले. सिन्नरचा दुष्काळी अन् डोळ्यांसमोर उभे पीक जळाले ही व्यथा ऐकून उपस्थित राजकीय नेत्यांची मने हेलावली. आदित्य ठाकरेंसारख्या नवख्या नेत्याने कोणते पीक ते त्याला येणारा खर्च प्रत्येक बाबी बारकाईनी विचारल्या.

Aditya Thackeray
Drought Condition : ‘गुगल मॅपिंग’द्वारे होणार अवर्षणाचे सर्वेक्षण

शेतकरी बांधवांनी शेतात जळालेले सोयाबीन पिकांच्या काड्या ठाकरे यांना दाखवत, ‘बघा साहेब... हा आहे सिन्नरचा दुष्काळ... सांगा सरकारच्या अनुदानाने खर्च निघेल का, एकरी साडेबावीस हजार सोयाबीन पीक उभारणीचा खर्च आहे, असे घंगाळवाडीचे शेतकरी सलीम शेख यांच्यासह शेतकरी बांधवांनी सांगितले.

Aditya Thackeray
Maharashtra Drought Condition : राज्यात १९४ तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती

यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, निफाडचे, माजी आमदार अनिल कदम, उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, नाशिकचे सुधाकर बडगुजर, भारत कोकाटे यांच्यासह उबाठा गटाचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

निफाडहून भेंडाळी मार्गे हिवरगाव टोमॅटो बाजार समितीच्या आवारात शेतकरी बांधवांशी पहिल्यांदा श्री. ठाकरे यांच्याशी संवाद साधला.

खडांगळीचे शेतकरी अर्जुन कोकाटे यांनी टोमॅटोच्या घसरलेल्या भावाविषयी नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने किमान पाचशे रुपये दराने टोमॅटो खरेदी करावी, तरच शेतकरी बांधवांचा खर्च निघेल, असे त्यांनी सांगितले. वडांगळीच्या हिवरगाव येथील शेतकरी शांताराम निवृत्ती खुळे यांच्या सोयाबीन शेतात श्री. ठाकरे यांनी भेट देऊन शेतकरी संवाद साधला.

अन्नदात्याला वाऱ्यावर सोडणार नाही ः ठाकरे

या संकट काळात शेतकऱ्यांना कोणी वाली नसताना, शिवसेना मात्र आपल्या अन्नदात्याला वाऱ्यावर सोडणार नाही. प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत उभी राहणार हा विश्‍वास आदित्य ठाकरेंनी बळीराजाला दिला आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com