Maharashtra Cabinet Meeting : दुष्काळाच्या उंबरठ्यावरील मराठवाड्यावर निधीचा वर्षाव

Fund Announcement For Marathwada : नैसर्गिक आपत्ती सोबतच निधीचा दुष्काळ सोसणाऱ्या मराठवाड्यासाठी तब्बल ४६ हजार ५७९ कोटी ३४ लाख रुपये खर्चाचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे जाहीर केला.
Eknath Shinde
Eknath Shinde Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : नैसर्गिक आपत्ती सोबतच निधीचा दुष्काळ सोसणाऱ्या मराठवाड्यासाठी तब्बल ४६ हजार ५७९ कोटी ३४ लाख रुपये खर्चाचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे जाहीर केला. यामध्ये मराठवाड्याकरिता ११ जलसंपदा प्रकल्पांकरिता १४ हजार कोटी रूपये, तर १३ हजार कोटी समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पासाठी १४ हजार कोटींचा निधी खर्च करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केले.

राज्य मंत्रिमंडळाची बहुचर्चित बैठक मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी (ता. १६) पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत निर्णयांची माहिती दिली. या वेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार उपस्थित होते.

पश्‍चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. सुमारे २२.९ अब्ज घनफूट पाणी वळविण्याकरिता १४ हजार ४० कोटींची योजना राबविण्यात येणार आहे. याशिवाय बैठकीत जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, नियोजन, ग्रामविकास, कृषी तसेच पशुसंवर्धन आदी विभागांशी निगडित विविध निर्णय घेण्यात आले. निर्णय पुढील प्रमाणे...

Eknath Shinde
Marathwada Drought : अवर्षणग्रस्त मराठवाड्याला भेडसावतोय निधीचा दुष्काळ

जलसंपदा विभाग

११ जलसंपदा प्रकल्पांना मान्यता, याकरिता १३ हजार ६७७ कोटी सुधारित खर्चाची तरतूद (प्रकल्प सिंचन क्षेत्र कंसात) याप्रमाणे : अंबड प्रवाही वळण योजना (ता. दिंडोरी), जि. नाशिक (१० कोटी ३३ लाख, ५१ हेक्टर सिंचन), निम्न दुधना प्रकल्प (ता. सेलू), जि. परभणी (७२८ कोटी ८५, परभणी-जालना मिळून ३४,४३८ हेक्टर सिंचन), जायकवाडी टप्पा- २ (ता. माजलगाव), जि. बीड (५३६ कोटी ६१ लाख, ८४८५० हेक्टर सिंचन),

बाभळी मध्यम प्रकल्प (ता. फुलंब्री), जि. नांदेड (७७१ कोटी २० लाख, १६०० हेक्टर सिंचन), वाकोद मध्यम प्रकल्प (ता. फुलंब्री), जि. छत्रपती संभाजीनगर (२७५ कोटी ०१ लाख, २२१७ हेक्टर सिंचन, पिण्याकरिता १.९१५ आरक्षित), ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प (ता. पुसद), जि. यवतमाळ (४१०४ कोटी ३४ लाख, १ लाख १८ हजार ७९० हेक्टर सिंचन), पोटा उच्च पातळी बंधारा (ता. औंढा, नागनाथ),

जि. हिंगोली (२३७ कोटी २० लाख, १ हजार ४२९ हेक्टर सिंचन), जोडपरळी उच्च पातळी बंधारा (ता. वसमत), जि. हिंगोली (२३६ कोटी ५१ लाख, १४३४ हेक्टर सिंचन), पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा (ता. वसमत), जि. हिंगोली (२६११ कोटी १२ लाख, १३५६ हेक्टर सिंचन), ममदापूर उच्च पातळी बंधारा (ता.पूर्णा), जि. परभणी (२७१ कोटी ८७ लाख, १३७५ हेक्टर सिंचन), उनकेश्‍वर उच्च पातळी बंधारा (ता. किनवट), जि. नांदेड (२३२ कोटी ७१, १०९० हेक्टर सिंचन) यांचा समावेश आहे.

याशिवाय वैजापूर तालुक्यातील शनिदेवगावला उच्चपातळीचा बंधाऱ्याला मान्यता मिळाली आहे, यामुळे १७९३ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार असून, याकरिता २८५ कोटी ६४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

Eknath Shinde
Marathwada Muktisangram: मंत्रीमंडळाची बैठक संभाजीनगरमध्ये घेऊन मराठवाड्याचा वनवास का संपेल?

साखळी बंधाऱ्यांना एकच मान्यता

राज्यात आता साखळी बंधाऱ्यांमधील प्रत्येक बंधाऱ्याची स्वतंत्र प्रशासकीय मान्यता न घेता प्रकल्प म्हणून सर्व साखळी बंधाऱ्यांची मिळून एकत्र प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. या संदर्भात स्थापन केलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम

मराठवाड्यातील रस्ते सुधारणार ३०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे, २४०० कोटींची तरतूद

नाबार्ड अर्थसाह्यातून मराठवाड्यात ४४ कामे, १०९ कोटी मिळणार

ग्रामविकास विभाग

मराठवाड्यातील ७५ ग्रामपंचायतींना आता स्वत:चे कार्यालय याकरिता ३ वर्षांत १८० कोटी

बीड येथे जिल्हा परिषदेची नवीन इमारत, ३५ कोटींची तरतूद

ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद. मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ

माहिती व तंत्रज्ञान संचालनालय

मराठवाड्यात ४३२ ग्रामपंचायतीना भारतनेट जोडणी वर्षभरात देणार, याकरिता २८६ कोटींची तरतूद

छत्रपती संभाजीनगर व नांदेड येथे विद्यापीठ परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यासाठी माहिती संग्रहालय.

Eknath Shinde
Cabinet Decisions : सहकार विभागाचा अध्यादेश रद्द ; क्रियाशील, अक्रियाशील सभासद व्याख्येत तिसऱ्यांदा बदल

कृषी विभाग

बीड येथे सीताफळ आणि इतर फळांवर प्रक्रिया उद्योगाकरिता ५ कोटींची तरतूद

हळद संशोधनासाठी हिंगोलीतील हरिद्रा संशोधन केंद्राकरिता १०० कोटी

अंबाजोगाई येथील शासकीय कृषी महाविद्यालयात मुलामुलींचे वसतीगृह सुरू. १०५ कोटी

परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय

परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय

कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय

परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र. सोयाबीन उत्पादनास गती येणार

सोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय

नांदेड येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय

... मृद्‌ व जलसंधारण

अहमदपूर तालुक्यातील मानार नदीवर ९ कोल्हापुरी बंधारे.

पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी आणि उंबर विहिरी साठवण तलाव

आष्टी आणि शिरूर तालुक्यात कोल्हापूर बंधाऱ्यांचे लातूर टाइप बॅरेजमध्ये रूपांतर

गंगाखेड तालुक्यातील मासोळी, घळाटी, टोकवाडी आणि पोखर्णी नदीवर सिमेंट नाले बंधारे.

सौर कुंपणासाठी थेट रक्कम

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या ७५ टक्के किंवा १५ हजार रुपये यापैकी जी कमी असेल अशी रक्कम थेट हस्तांतर (डीबीटी) पद्धतीने अनुदान स्वरूपात देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. योजनेसाठी २०२३-२४ साठी अर्थसंकल्पीत शंभर कोटी रुपयांपैकी साठ कोटी रुपयांची तरतूद सौरऊर्जा कुंपणाकरिता करण्यात आली आहे.

भ्रूण प्रत्यारोपणासाठी प्रयोगशाळा

गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी गायी-म्हशींमध्ये भ्रूण प्रत्यारोपणाची सुविधा किफायतशीर दरात निर्माण करण्याकरिता फिरती प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विदर्भ, मराठवाडा, पुणे विभाग आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी अनुक्रमे अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नगर येथे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चार OPU-IVF & ET प्रयोगशाळा स्थापन करण्यात येतील. या तीन प्रयोगशाळांसाठी एकूण रु. १८०२.७२ लाख इतका निधी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत करण्यात येईल.

पशुसंवर्धन विभाग

मराठवाड्यात दुधाची क्रांती येणार. सर्व जिल्ह्यातील ८६०० गावांत दुधाळ जनावरांचे वाटप : ३२२५ कोटी

तुळजापूर तालुक्यात शेळी समूह योजना : १० कोटी

अंबाजोगाई तालुक्यात लाल कंधारी, देवणी देशी गोवंशाचे जतन करणार : ४ कोटी

छत्रपती संभाजीनगर येथे फिरत्या भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना

लाल कंधारी, देवणीचे जतन

लाल कंधारी व देवणी गोवंश प्रजातींचे जतन व संवर्धनाकरिता अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथे पशुसंवर्धन विभागाची ८१ हेक्टर जमीन प्रक्षेत्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळास देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला. लाल कंधारी व देवणी या देशी गोवंशाचे मूळ पैदास क्षेत्र मराठवाड्यात असून, सदर गोवंशाचे अस्तित्व मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आहे.

२०१३ मध्ये लाल कंधारी गायींची संख्या १,२६,६०९ इतकी होती, ती २०२० मध्ये १,२३,९४३ इतकी कमी झाली आहे. तसेच २०१३ मध्ये देवणी गायींची संख्या ४,५६,७६८ वरून वर्ष २०२० मध्ये १,४९,१५९ इतकी कमी झाली आहे.

सदर प्रजातींचे महत्त्व विचारात घेऊन या जातींचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. साकुड पशुपैदास प्रक्षेत्रासाठी १३ नियमित पदे व ३७ इतकी पदे बाह्यस्रोतांद्वारे भरण्यात येतील. पशुधनासाठी चारा, पशुखाद्य, औषधी तसेच वीज, पाणी यांसाठी दरवर्षी ६ कोटी इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com