Sugar Crushing : यंदा पाच लाख टन उसाचे गाळप

लोकसहभागातून व भूमिपुत्रांच्या मेहनतीने सुरू झालेल्या भोरस (ता. चाळीसगाव) येथील बेलगंगा साखर कारखान्याने गेल्या वर्षी १ लाख ७५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते.
Sugar
SugarAgrowon
Published on
Updated on

चाळीसगाव, जि. : जळगाव : लोकसहभागातून व भूमिपुत्रांच्या मेहनतीने सुरू झालेल्या भोरस (ता. चाळीसगाव) येथील बेलगंगा साखर कारखान्याने (Belganga Sugar Mill) गेल्या वर्षी १ लाख ७५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. यावर्षी कमीत कमी ५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट्य आहे, असा विश्‍वास कारखान्याचे अध्यक्ष चित्रसेन पाटील (Chitrasen Patil) यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या २०२२-२३ च्या गळीत हंगामास बुधवारी (ता. २६) भाऊबीज-पाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला.

Sugar
Crop Advisory : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कृषी सल्ला

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष चित्रसेन पाटील यांनी सांगितले, की आतापर्यंत साखर आयुक्तालयाच्या परिपत्रकानुसार राज्यातील फक्त १६ कारखाने सुरू झाले आहेत. त्यात बेलगंगा साखर कारखाना आहे. तसेच राज्यात यावर्षीच्या गळीत हंगामात फक्त २०३ साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता असल्याचे साखर आयुक्तालयाचा अंदाज असून, फक्त ९७ कारखान्यांना गाळप परवाने दिलेले आहेत.

त्यामुळे कारखान्याने विश्वासार्हता निर्माण करून शेतकऱ्यांच्या भरवशावरच कारखान्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या हंगामाच्या वेळी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शंभर टक्के रक्कम दिल्यामुळे शेतकरी वर्ग खूष आहे, असेही ते म्हणाले.

सुरवातीला काटापूजन, गव्हाण पूजन, नंतर गव्हाणीत मोळी टाकण्याचा कार्यक्रम होऊन गळीत हंगामास सुरवात झाली. कारखान्याचे संचालक अजय शुक्ल, नीलेश निकम, आर्किटेक्ट किरण देशमुख, रवींद्र केदारसिंग पाटील, अशोक ब्राह्मणकर, ॲड. ठोके, तसेच मोनिका पाटील, नीतू शुक्ल, स्वाती देशमुख, ऊस उत्पादक शेतकरी वर्ग, कारखान्याचे कर्मचारी, इतर मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com