
Jalgaon News : रासायनिक खतांच्या पुरवठ्यात अनियमितता असून, त्याबाबत तातडीने दखल घ्यावी, यासह पिकांच्या नुकसानीबाबत कंपन्यांकडून दिशाभूल होतेय, त्याकडेही लक्ष द्यावे. पावसाने यंदा तारले मात्र कृषी विभागाने शेतकऱ्यांना मारू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी कृषी विभाग, लोकप्रतिनिधी आदींकडे याबाबत माहिती दिली असून, सुरळीत खतपुरवठ्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. खतांचा मोठा वापर जळगाव जिल्ह्यात केला जातो. परंतु शासन त्यासाठी योग्य तरतूद, कार्यवाही करीत नाही.
दरवर्षी खतांचा तुटवडा असतो. त्यात शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. यंदाही हीच स्थिती आहे, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बनावट खते, संप्रेरकेही आहेत. त्याबाबत ठोस कारवाई केली जात नाही. यामुळे कृषी विभागाची भूमिकादेखील संशयाच्या भोवऱ्यात आहे, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.
...या केल्या मागण्या
रासायनिक खत बाजारपेठेमध्ये जादा दराने/लिंकिंगने घ्यावा लागत आहेत व काही ठिकाणी खत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याची तत्काळ दखल घेत जळगाव जिल्ह्यात असलेल्या खतांचा बफर स्टॉक रिलीज करावे. गेल्या वर्षी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत जळगाव जिल्हा मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, मका आदी पिकांसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती.
अंदाजे २०० कोटींचा निधी याअंतर्गत प्राप्त झाला होता. या वर्षी देखील योजनेत शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवीत असून, ज्या त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या दूर कराव्यात. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ‘पोकरा’ योजनेच्या योग्य अंमलबजावणीचाही मागणी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.