Fertilizer Sale : चिपळूणमध्ये १६३४ टन खत विक्री

Fertilizer Stock : मुसळधार पाऊस झाल्यानंतर लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. भाताचे उत्पन्न चांगले यावे यासाठी लावणी सुरू असताना आणि लावणी झाल्यानंतर खताची मात्रा दिली जाते.
Fertilizer
FertilizerAgrowon

Chiplun News : जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने लावणीची कामे पूर्ण झाली. शासनाकडून खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या मागणीनुसार खतांचा पुरवठा झाला असून शेतकऱ्यांकडून खताची उचलही झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात १६३४ टन खताची विक्री झाली आहे.

मुसळधार पाऊस झाल्यानंतर लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. भाताचे उत्पन्न चांगले यावे यासाठी लावणी सुरू असताना आणि लावणी झाल्यानंतर खताची मात्रा दिली जाते. तसेच आंबा, काजू, नारळ आणि इतर झाडांना दाणेदार खतांची मात्रा दिली जाते. पाऊस सुरू होताच शेतकऱ्यांनी खत विक्री केंद्रातून खत खरेदी करण्यास सुरुवात केली होती. चिपळूण तालुका खरेदी-विक्री संघाकडे शासनाकडून खत पुरवठा होतो.

Fertilizer
Urea Fertilizer : नांदेड जिल्ह्यात युरिया खत मुबलक प्रमाणात उपलब्ध

तेथून ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सोसायट्यांना खत विक्रीसाठी पाठवले जाते. चिपळूण तालुक्यात ४५ विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. त्यांना खतपुरवठा केला जातो. तालुका खरेदी-विक्री संघात खतांची विक्री सुरू आहे. लोटेसह इतर तालुक्यांतील शेतकरीही येथून खत घेऊन जात आहेत.

Fertilizer
Fertilizer Stock : गोंदियामध्ये दोन लाख रुपयांचा खत साठा जप्त

खरेदी-विक्री संघाकडे खरीप हंगामासाठी १६५० टन खत आले होते. संघाकडे पूर्वीचे ४९ टन खत शिल्लक होते. त्यामुळे यावर्षी एकूण १६९९ टन खत विक्रीसाठी उपलब्ध होते. यातील १६३४ टन खताची विक्री झाली आहे.

खरेदी-विक्री संघात या वर्षी युरिया, सुफला, १५-१५-१५, १८-१८-१०, १०-२६-२६, एसएसपी पॉवर, दाणेदार, कोकण सम्राट, शास्वत, प्रोटोमॉल अशी खते विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शासनाकडून मिळालेल्या सूचनेप्रमाणे खतांची विक्री सुरू असल्याची माहिती येथील कर्मचारी परेश आरेकर यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com