विद्युत मोटारचलित फुले कुट्टी यंत्र
एक अश्वशक्ती सिंगल फेज मोटारचलित. लहान व मध्यम शेतकऱ्यासाठी उपयुक्त. जनावरांच्या चाऱ्यासाठी - चारा कोरडा व ओला ओला चारा - ज्वारी ३३० किलो प्रति तास, मका २७२ किलो प्रति तास, ऊस ४२७ किलो प्रति तास. कोरडा चारा - ज्वारी २०२ किलो प्रति तास, मका १७४ किलो प्रति तास. उभ्या उसाचा पाला काढण्याचे यंत्र
ट्रॅक्टरचलित (लीफ श्रेडर किंवा डी-ट्रंशर)
२४ व त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते. उभ्या उसाचा पाला सहजपणे काढता येतो. उसाच्या वाढीसाठी उत्तम हवामान मिळते आणि उसाची वाढ चांगली होते. काढलेला पाला जमिनीचा ओलावा टिकवण्यासाठी मल्चिंग म्हणून वापरता येतो. त्याचे उत्तम सेंद्रिय खत तयार होते. उसाची पाने न जाळल्याने पर्यावरणाचे प्रदूषण टळते. डि-ट्रंशरमुळे देठ जमिनीच्या जवळ कापण्यास मदत होते. हे यंत्र ४० व त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते. विविध प्रकारचे गवत व पालापाचोळा गोळा करण्यासाठी उपयुक्त. खर्चात व वेळेत सुमारे ४० ते ५० टक्के बचत. पाचटाचे गठ्ठे बनविणारे यंत्र ट्रॅक्टरचलित बेलर
३५ व त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते. एका तासात १८ टनांपर्यत पालापाचोळा व पाचटाचे गठ्ठे बनविता येतात. क्षमता- ०.३९ हेक्टर प्रति तास. गोल आणि आयताकृती बेलिंगसाठी उपयुक्त. ऊस खोडवा तासणीसाठी
ट्रॅक्टरचलित रटून मॅनेजर
हे यंत्र ३५ व त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते या यंत्राचा वापर केल्याने कमकुवत फुटव्यांची अनावश्यक वाढही रोखली जाते. ऊस तोडणीनंतरचा उसाचा खोडवा व्यवस्थित कापला किंवा तासला जातो. उसाचा खोडवा तासणे, खत देणे व बगला फोडण्याचे काम एकाच वेळेस होत असल्याने कष्ट, वेळ व खर्चात बचत होते. क्षमता- ०.४४ हेक्टर प्रति तास पारंपारिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ७२ टक्के बचत. ट्रॅक्टरचलित बेलर स्प्रेडर
३५ व त्यापेक्षा अधिक अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते. याचा वापर भात, गव्हाचा पेंढा पसरविण्यासाठी केला जातो. भात, गव्हाचे छोटे तुकडे करून सेंद्रिय खत तयार करता येते. यामुळे जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन १५ ते २० टक्के वाढू शकते. पिकांचे अवशेष उघड्यावर जाळण्याची गंभीर समस्या या यंत्राच्या वापराने कमी होऊ शकते. - डॉ. तुळशीदास बास्टेवाड, ९४२३३४२९४१
(प्राध्यापक व प्रमुख संशोधक, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)