Mukund Pingale
उन्हाळा कांदा दारात सध्या घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सकाळी प्राथमिक स्वरूपात दिला.
बंद करत आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे संघटनेचे पदाधिकारी व कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
सरकारने कांद्याची निर्यात वाढण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात येईल अशी सरकारने सातत्याने घोषणा केल्या.
मात्र खर्च दुप्पट झाला तर उत्पन्न निम्म्यावरच राहिले अशी टीका यावेळी दिघोळे यांनी सरकारवर केली. सरकारने याबाबत पाऊने न उचलल्यास मंत्रालयात कांदा ओतण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.