Electricity Supply : निफाड तालुक्याच्या पूर्व भागात चोरट्यांचा महावितरणला झटका

Mahavitaran Update : हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर वीजपुरवठा होत नसल्याचे अनेक तक्रारी आहेत. मात्र अशी परिस्थिती असताना आता चोरट्यांनी शेतकऱ्यांची आणि महावितरणची डोकेदुखी वाढवली आहे.
Electricity Supply
Electricity SupplyAgrowon
Published on
Updated on

Nashik News : हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर वीजपुरवठा होत नसल्याचे अनेक तक्रारी आहेत. मात्र अशी परिस्थिती असताना आता चोरट्यांनी शेतकऱ्यांची आणि महावितरणची डोकेदुखी वाढवली आहे.

निफाड तालुक्यातील पूर्वभागातील देवगाव, रुई येथील विद्युत रोहित्र चोरीनंतर खेडलेझुंगे येथे एक महिन्याच्या आतच दोन विद्युत रोहित्र चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. देवगाव उपकेंद्र परिसरात गत सहा महिन्यात साधारणतः सहा रोहित्रांची झाली आहे.

Electricity Supply
Mahavitaran : ‘महावितरण’ला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी पुरस्कार

शनिवारी (ता. १०) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी खेडलेझुंगे-कोळगाव रस्त्याला लागून असलेल्या शेतकरी जनार्दन घोटेकर यांच्या मालकीच्या गट.नं.५७२ मधील रोहित्र चोरले. त्यातील धातू,ऑइल चोरून नेले. सकाळी तेथील शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना दिली.

यासंदर्भात महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता राहुल काकड, वीज तंत्रज्ञ संतोष चौरे, विद्युत कर्मचारी चेतन मेमाणे, संजय घोटेकर यांनी लासलगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. थ्री फेज वीजपुरवठा सुरू असताना रोहित्राची चोरी करणे म्हणजे जिवाशी खेळ करण्यासारखे आहे. हे चोरटे निश्चितच विद्युत कामासंदर्भात प्रशिक्षित असावेत.

वर्षाचे पीक वाया जाण्याची शक्यता

विद्युत रोहित्र नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. सध्या शेतीमध्ये ऊस, डाळिंब, द्राक्षे यासारखी नगदी पिके आहेत. दिवस उन्हाळ्याचे असल्याने पिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवण्याची गरज असते.

डाळिंब फळ पोषण होण्याच्या स्थितीत असल्याने पाण्याचा ताण सहन करू शकत नाही. पाण्याची कमतरता जाणवल्यास फळ गळ होऊन शेतकऱ्याचे वर्षाचे पीक वाया जाण्याची शक्यता असून मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीने तत्काळ रोहित्र बसवून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच माया सदाफळ, योगेश साबळे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com