Paddy Seedling Damage : भातरोपे कुजल्याने शेतकरी संकटात

Kharif Paddy : या पावसामुळे तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील भातशेती पाण्याखाली आली होती. त्यामुळे रोपे कुजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Paddy Crop Damage
Paddy Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Raigad News : आठवडाभरापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने उरण तालुक्याला गेल्या अक्षरशः झोडपून काढले होते. या पावसामुळे तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील भातशेती पाण्याखाली आली होती. त्यामुळे रोपे कुजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

उरण तालुक्यातील पुनाडे, सारडे, पिरकोन, वशेणी, गोवठणे, पाले, आवरे, कडापे,पानदिवे, कोप्रोली, खोपटे, कळंबुसरे, चिरनेर भोम,कंठवली, विंधणे इत्यादी ग्रामीण भागातील शेतात पाणी साचले आहे.

Paddy Crop Damage
Paddy Sowing: भाताची लागवड दोन टक्क्यांनी वाढली; पावसाची चिंता मात्र कायम

उशिरा झालेला पाऊस यामुळे करपलेली पिके, त्यांनतर दुसऱ्यांदा लावणी केलेली भाताची रोपे पाण्याखाली असल्याने छोट्या रोपांना सूर्यप्रकाश मिळाला नसल्याने भाताची रोपे कुजून वाया गेली आहेत.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उरणमध्ये आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. अशातच गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने शेतात साचलेल्या पाण्यामुळे रोपांना यांचा फटका बसल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे.

Paddy Crop Damage
Paddy Sowing : भात लागवडी पोहोचल्या ४९ टक्क्यांवर

महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा केलेली पेरणी पिके कुजल्यामुळे आता पुन्हा बी-बियाणांची जमवा-जमव करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने शासनाने तात्काळ पंचनामा करून मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

शेती शिवाय आम्हाला कोणत्याही उत्पन्नाचे साधन नाही. शेतीवर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे आमच्याकडे शासनाने लक्ष द्यावे. शेतात पिके कुजल्याने तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ आली आहे.
- संगीता पाटील, शेतकरी
शेतात पीक कुजल्याने मेहनतीचा पैसा, श्रम सर्वच वाया गेले आहेत. लावणीच्या वेळी जेवण नाष्ट्यासोबत ३०० ते ३५० रुपये मजुरी देऊन शेत लावली होती. आता तीही पाण्याखाली गेल्याने डोळ्यापुढे अंधार आहे.
- विनोद पाटील, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com