Paddy Sowing: भाताची लागवड दोन टक्क्यांनी वाढली; पावसाची चिंता मात्र कायम

Rice cultivation : देशात तांदळाचे भाव वाढलेले असतानाच खरिपातील लागवड गेल्यावर्षीच्या तुलनेत काहीशी वाढली आहे. देशातील शेतकऱ्यांनी २३७ लाख हेक्टरवर भाताची लागवड झाली. सध्याची लागवड गेल्यावर्षीपेक्षा जवळपास दोन टक्क्यांनी अधिक दिसते.
Paddy Plantation
Paddy Plantation Agrowon

Rice Crop : पुणेः देशात तांदळाचे भाव वाढलेले असतानाच खरिपातील लागवड गेल्यावर्षीच्या तुलनेत काहीशी वाढली आहे. देशातील शेतकऱ्यांनी २३७ लाख हेक्टरवर भाताची लागवड झाली. सध्याची लागवड गेल्यावर्षीपेक्षा जवळपास दोन टक्क्यांनी अधिक दिसते. पण देशातील अनेक भागांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज असल्याने पिकावर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

जून महिन्यात देशातील बहुतांशी भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होता. त्यामुळे पेरण्याही रखडल्या. त्यातच भात हे जास्त पाणी लागणारे पीक. त्यामुळे भाताची लागवड मध्य आणि दक्षिण भारतात पिछाडीवर पडली होती. पण जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने पेरण्यांच्या कामांना गती आली. त्यातही भात लागवडीत चांगलीच वाढ झाली. सध्या गेल्यावर्षीपेक्षा भाताची लागवड जवळपास दोन टक्क्यांनी वाढली.

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तांदूळ उत्पादक आहे. तर जागतिक तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा ४० टक्के आहे. पण भारताने नुकतेच बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. देशात भाव वाढल्याने सरकारने हा निर्णय घेतला. केंद्र सरकार बासमती आणि अर्ध उकडलेल्या तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घालू शकते, अशी चर्चा बाजारात आहे. त्यातच भारतात तांदूळ लागवड वाढल्याने चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. असे झाल्यास केवळ भारतच नाही तर भारताने तांदूळ निर्यातबंदी केल्यानंतर ज्या देशांना फटका बसत आहे त्या देशांनाही दिलासा मिळेल, असे निर्यातदार सांगत आहेत. 

Paddy Plantation
Paddy Farming : रत्नागिरी जिल्ह्यात भाताची १४३१ हेक्टरवर लागवड

यंदा उत्तर भारतात चांगला पाऊस होता. जूनमध्ये आलेल्या बिपरजाॅय चक्रीवादळामुळे अनेक भागांमध्ये पाऊस झाला. परिणामी भात लागवडीला वेग आला. उत्तरेतील राज्यांमध्ये अनेक भागात भाताची लागवड वेळेवर झाली. पण जुलैमहिन्यात पंजाब आणि हरियानात अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. याचा फटका भात पिकाला बसला. 

तर ३१ जुलै रोजी हवामान विभागाने माॅन्सून काळातील दुसऱ्या सत्रातील म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. पण हा अंदाज काहीसा चिंता वाढवणारा आहे. कारण ऑगस्टमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या काळात ९४ ते ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने जारी केला. यामुळे खरिप पिकांची चिंता वाढली. त्यातही भात पिकाला यापुढे फटकाही बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com