Rahul Gandhi : शेतकरी धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवावा लागेल ः राहुल गांधी

भारत जोडोला महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद मिळाला. युवकांनी त्यांची स्वप्ने मांडली. शेतकऱ्यांनी समस्या व्यक्त केल्या. रस्त्यांवर चालताना खूप काही शिकायला मिळाले. ही माझ्यासाठी राजकीय जीवनातील समज ठरेल,’’ असे गांधी म्हणाले.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Agrowon
Published on
Updated on

अकोला : ‘‘आज सरकारची मानसिकता बदलण्याची गरज आहे. शेतकरी आपल्या धोरणाच्या (Agriculture Policy) मध्यवर्ती केंद्रस्थानी ठेवावा लागेल. त्याची रक्षा करणे ही आपली जबाबदारी आहे,’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे खासदार राहुल (Rahul Gandhi) गांधी यांनी केले भारत जोडो यात्रेअंतर्गत (Bharat Jodo Yatra) गुरुवारी (ता.१७) वाडेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत गांधी बोलत होते.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : मोदी सरकारच्या काळात विमा कंपन्यांकडून लूट

गांधी म्हणाले, ‘‘शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा. त्याला वेळेवर कर्जपुरवठा केला पाहिजे. सरकारने त्यांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात. यूपीए सरकारच्या काळात हे सर्व केले जात होते. मात्र आता शेतकरी, युवक हा सरकारपासून दूर आहे . त्यामुळेच भारत जोड़ो यात्रेला युवकांचा, शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.’’

‘‘भारत जोडोला महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद मिळाला. युवकांनी त्यांची स्वप्ने मांडली. शेतकऱ्यांनी समस्या व्यक्त केल्या. रस्त्यांवर चालताना खूप काही शिकायला मिळाले. ही माझ्यासाठी राजकीय जीवनातील समज ठरेल,’’ असे गांधी म्हणाले.

‘‘देशात भीती, एकमेकांमध्ये द्वेष, हिंसा पसरविण्याचे काम भाजप करीत आहे. विरोधकांना दाबण्याचे काम सुरू आहे. युवकांना रोजगाराची शाश्वती राहिलेली नाही. जो अन्न देतो, त्याला कोणाची साथ नाही. तो विमा काढतो तर त्याला लाभ मिळत नाही. मालाला भाव मिळत नाही. महाराष्ट्रात सरकारी शिक्षण संस्था, दवाखाने बंद केले जात आहेत,’’ असे मत त्यांनी मांडले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com