Rahul Gandhi : मोदी सरकारच्या काळात विमा कंपन्यांकडून लूट

मोदी सरकारच्या काळात देशातील शेतकरी आणि शेती संपविण्याचे काम केले जात आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

कळमनुरी, जि. हिंगोली ः मोदी सरकारच्या (Modi Government) काळात देशातील शेतकरी आणि शेती (Indian Agriculture) संपविण्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांकडून पीकविमा (Crop Insurance) हप्ता भरून घेतला जातो. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Crop Damage Compensation) मिळत नाही.

Crop Insurance
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

अत्यंत तुटपुंजी भरपाई मिळते. या सरकारच्या काळात पीकविमा कंपन्या मालामाल झाल्या. परंतु शेतकरी मात्र कंगाल झाले आहेत. विमा कंपन्या शेतकऱ्यांची खुलेआमपणे लूट करत आहेत, असा आरोप खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला.

भारत जोडो यात्रा कळमनुरी येथे दाखल झाल्यानंतर शनिवारी (ता. १२) रात्री आयोजित चौक सभेत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व पदयात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात, माजी मंत्री वर्षा गायकवाड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी राज्यमंत्री रजनी सातव, आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. प्रज्ञा सातव, संपतकुमार आदी उपस्थित होते.

Crop Insurance
Sugar Export : मे नंतर आणखी साखर निर्यातीस परवानगी शक्य

राहुल गांधी म्हणाले, की कळमनुरी भागात काही शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी शेतातील सर्व पीक वाया गेली असल्याचे दाखविले. सोयाबीनचे संपूर्ण नुकसान झाले. परंतु पीकविमा कंपन्यांकडून भरपाई मिळत नाही. कोणाकडे दाद मागावी हेही समजत नाही असे शेतकऱ्याने सांगितले.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील आठ वर्षात शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाचे अपरिमित नुकसान झाले आहे. ‘मनरेगा’चा रोजगार मिळत नाही. कामगारांच्या हाताला काम नाही. शेतात राबणारे शेतकरी देशोधडीला लावला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com