Cotton Boll Worm : तेलंगणामुळे बोंड अळीची भीती

देशात यावर्षी कापूस उत्पादकता प्रभावित होण्याच्या पार्श्‍वभूमीवर तेलंगणा सरकार उन्हाळी कापूस लागवडीस प्रोत्साहन देण्याच्या विचारात आहे. दक्षिण तेलंगणा भागात हा प्रयोग केला जाणार असला तरी त्याला केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने हरकत घेतली आहे.
Cotton Boll Worm
Cotton Boll WormAgrowon

नागपूर ः देशात यावर्षी कापूस उत्पादकता (Cotton Production) प्रभावित होण्याच्या पार्श्‍वभूमीवर तेलंगणा सरकार उन्हाळी कापूस लागवडीस (Summer Cotton Cultivation) प्रोत्साहन देण्याच्या विचारात आहे. दक्षिण तेलंगणा भागात हा प्रयोग केला जाणार असला तरी त्याला केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने हरकत घेतली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव (Cotton Boll Worm) यामुळे वाढीस लागण्याचा धोका संस्थेने वर्तविला आहे.

Cotton Boll Worm
Cotton Thief : शेतातील कापूस चोरीचे प्रकार वाढले

देशाचे सरासरी क्षेत्र सुमारे १३० लाख हेक्‍टर आहे. त्यापैकी ४० लाख हेक्‍टर क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात सोयाबीनखालील क्षेत्रात वाढ होते कापसाखालील क्षेत्र कमी झाले होते. गेल्या हंगामात कापसाला चांगला दर मिळाल्याने यंदा लागवडीखालील क्षेत्राने सरासरी गाठली आहे. मात्र संततधार पाऊस, अतिवृष्टीच्या परिणामी यंदा कापसाची उत्पादकता प्रभावित होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अशातच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने मात्र कापूस उत्पादकता समाधानकारक राहणार असल्याचे जाहीर केले.

Cotton Boll Worm
Cotton Market : शेतकऱ्यांनीच फिरवला कापूस बाजार

देशात यंदा ३४४ लाख कापूस गाठींच्या उत्पादनाचा सीएआचा अंदाज आहे. या साऱ्या घडामोडीत तेलंगणा सरकार मात्र कापूस उत्पादकतेबाबत अनिश्‍चितता व्यक्‍त करीत आहे. त्यामुळे तेलंगणा सरकारने कृषी विभागाला यंदा उन्हाळी कापूस लागवडीसाठी तयारीचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाकडून हालचालींना वेग आला असताना तेलंगणा सरकारच्या या भूमिकेबद्दल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने आक्षेप घेतला आहे.

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखता यावा याकरिता या किडीसाठी लागणाऱ्या अन्नसाखळीचा पुरवठा खंडित होणे गरजेचे राहते. मात्र तेलंगणा सरकारच्या उन्हाळी कापूस लागवडीच्या निर्णयाने ही साखळी खंडित होणार नाही. परिणामी, येत्या काळात गुलाबी बोंड अळीचा धोका वाढणार आहे. ही स्थिती लक्षात घेता तेलंगणा सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही तेलंगणा सरकारकडून कृषी विभागामार्फत उन्हाळी कापूस लागवडीसाठी वेगाने हालचाली होत असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

कापूस उत्पादनात घट होईल या शक्‍यतेने तेलंगणा सरकारकडून उन्हाळी कापूस लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत आहे. कृषी विभागामार्फत त्याची अंमलबजावणी प्रस्तावीत आहे. परंतु यामुळे येत्या काळात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने त्यांना उन्हाळी कापूस घेऊ नये, अशी सूचना केली आहे.

- डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक, केंद्रिय कापूस संशोधन संस्था, नागपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com