
कोल्हापूर ः महापुराची नुकसानभरपाई (Flood Compensation Kolhapur) मिळत नसल्याने जिल्ह्यातील १२ हजार ६५३ शेतकरी, तसेच पाणीपुरवठा संस्था (Water Supply Organization) अडचणीत आल्या आहेत.
जिल्ह्यात २०१९ ला महापूर आला. यात हजारो शेतीपंप व त्यांच्या वीज जोडण्या पाण्यात गेल्याने नुकसान झाले. शेतकऱ्यांनी तसेच पाणी संस्थांनी स्वतःचे पैसे खर्च करून दुरुस्त करून घेतली. यात वीज तारा, वीज खांब, बसबार पेट्या, सर्किट बोर्ड, तसेच विजेची मोटर अशा सामुग्रीचे नुकसान झाले होते. दोन हजार रुपयांत एक लाखापर्यंतचा खर्च शेतकरी व पाणी संस्थांनी केला. २०२१ ला पुन्हा महापूर आला. पुन्हा वीज पंप, मोटर्स व विजेचे साहित्याचे नुकसान झाले.
सलग दुसऱ्यांदा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. याची दखल घेत इरिगेशन फेडरेशनने ज्येष्ठ नेते कै. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत नुकसानभरपाईची मागणी राज्य शासन व महावितरणकडे केली होती. तत्कालीन ऊर्जामंत्र्यांनी शेतीपंपाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महावितरणला दिले. त्यानुसार पंचनामेही झाले. त्याचे तपशील मंत्रालयातही पोहोचले. मात्र, शेतकरी व पाणी संस्थांना भरपाईसंदर्भात निर्णय झालेला नाही. फेडरेशन दोन वर्षांपासून भरपाईसाठी पाठपुरावा करीत असूनही दखल घेतली गेली नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.