कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने ओसरू लागला

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत आहे. जे पाणी द्रुतगतीने वाढले, त्याचा उतार मात्र संथ गतीने होत असल्याने जिल्ह्यात चिंता कायम आहे.
पूर फुटाने वाढला,  इंचाने ओसरू लागला The floodwaters rose, Inches began to oscillate
पूर फुटाने वाढला,  इंचाने ओसरू लागला The floodwaters rose, Inches began to oscillate
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत आहे. जे पाणी द्रुतगतीने वाढले, त्याचा उतार मात्र संथ गतीने होत असल्याने जिल्ह्यात चिंता कायम आहे. पाणी लवकर ओसरत नसल्याने शेतीचे नुकसान वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका दिवसात जे पाणी आठ ते दहा फुटाने वाढले तेच पाणी आता पाऊस थांबून चार दिवस झाले तरी ही केवळ दिवसाला एक ते दोन फुटांनी उतरत आहे. परिणामी शिवारे अजूनही पुराच्या पाण्याने वेढलेली आहेत. पाणी जास्त दिवस थांबून राहत असल्याने विशेष करून खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे. बहुतांशी नद्या अजूनही धोका पातळीवर आहेत. चार दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात पूर्ण विश्रांती घेतली आहे, तरीही नद्यांचे पाणी गतीने ओसरत नाही.  जिल्ह्यात पंचगंगेचे पाणी कोल्हापूर शहर परिसरात काहीशा गतीने कमी होत आहे, तर इचलकरंजी, शिरोळ, कुरुंदवाड या पूरपट्ट्यात नदीचे पाणी उतरण्याची गती अत्यंत धीमी आहे. दिवसाला केवळ एक ते दोन फूट पाणी या भागातून कमी होत आहे. हीच परिस्थिती वारणा व कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या गावांची आहे. यामुळे गावठाणातील पाणी कमी होत असली तरी शेतीतील पाणी तसेच वाहत आहे.  पूरपट्यात अजूनही महापुराने वेढलेली ८० टक्के शेतीत पाणी आहे. पाणी जास्त दिवस साचून राहत असल्याने खरीप पिके पूर्णपणे हातची जाण्याचा धोका आहे. तसेच वाढीच्या अवस्थेतील उसाला याचा मोठा फटका बसेल, अशी शक्यता आहे. दरम्यान पूर ओसरू लागल्याने अनेक महत्त्वाचे मार्ग रिकामे होऊ लागले आहेत. महापूर हटू लागला; बाजार उघडला सांगली : कृष्णा नदीचा महापूर ओसरू लागताच सांगलीकरांनी आपली घरे, व्यवसाय, संसार सावरण्याची धडपड सुरू केली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी सांगलीत ४८.६ फुटांवर पाणी होती. सोमवारची सकाळ सांगलीकरांसाठी दुहेरी दिलासा देणारी ठरली. एकीकडे कृष्णा नदीच्या महापुराने संथ का असेना, मात्र परतीचा प्रवास सुरू केला तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने तब्बल ९५ दिवसांनंतर बाजारपेठा उघडल्या. लोकांनी दुकाने, व्यापारपेठांसह तळघरातील पाणी स्वच्छतेसाठी इंजिन, मोटरी, एचटीपीने पाणी काढण्यासह स्वच्छता सुरू झालेली आहे. महापूरग्रस्तांना तातडीची दहा हजारांची मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केली आहे. दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ, पाच किलो डाळीची मदत सरकारने जाहीर केली आहे. पूर तासाला इंचभराने कमी होतो आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com