Gold Rate : सोन्याचे दर नरमले

केंद्रीय अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर काही दिवसांत सोने दरात नरमाई आली आहे.
Gold Market
Gold MarketAgrowon

Gold Market Rate जळगाव : केंद्रीय अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर काही दिवसांत सोने दरात (Gold Rate) नरमाई आली आहे. सोने दर ५७ हजार ३०० रुपये प्रति तोळापर्यंत खाली आले आहेत.

तर चांदीच्या दरातही (Silver Rate) मागील २५ दिवसांत सुमारे पाच हजार रुपयांची घसरण (किलोमागे) झाली आहे.

अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर लागलीच सोने, चांदीच्या दरात वाढ झाली होती. सोने बाजारात उसळी आली होती. सोन्याच्या दरात प्रतितोळ्यामागे ८०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल तीन हजारांची वाढ झाली होती.

पण मागील आठ ते १० दिवसांत सोने दर एक तोळ्यामागे सुमारे १८०० रुपयांनी घसरले आहेत. सोने, चांदीचे दर वाढतच जातील, असे चित्र होते; मात्र, सोने व चांदीच्या दरात घसरण झाली.

Gold Market
Gold Rate : सोन्याचा दर ५५ हजारांवर

सोने, चांदीमध्ये केलेली गुंतवणूक लागलीच रोकड देणारी मानली जाते. सोने, चांदी मोड दिली, की मिळालेल्या पैशांतून नागरिक आपली आर्थिक गरज पूर्ण करतात. यामुळे सोन्यात दरवर्षी गुंतवणूक वाढत आहे.

नवीन वर्षात सोने, चांदी बाजारात तेजीचे वातावरण होते. २५ दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात एक हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात एक हजारांची वाढ झाली होती.

तेव्हा सोन्याचा दर ‘जीएसटी’सह ५८ हजार ८०० वर पोहोचला होता. चांदीचा दर ‘जीएसटी’सह ७२ हजार १०० वर पोहोचला होता.

Gold Market
Gold Rate : सोने-चांदी दरात चढउतार

गेल्या महिन्यात सोन्याचा दर ‘जीएसटी’सह ५९ हजार १२२ रुपये प्रतितोळा तर चांदीचा दर ७४ हजार रुपये प्रतिकिलो होता. पण ग्रामीण अर्थव्यवस्था शेतीमालाचे दर कमी असल्याने विस्कळीत होत आहे. शेतीमाल अद्याप घरात किंवा शेतात आहे.

यामुळे सोने खरेदी कमी दिसत आहे. फक्त लग्नसराई व इतर शुभ कार्यासाठी सोने खरेदीकडे कल आहे. अधिकतर ग्रामीण भागातील महिलांचा सोने खरेदीकडे अधिक कल असतो. पण मागील २० ते २५ दिवसांत सोने बाजार संथ झाला आहे.

गेल्या काही दिवसांतील सोने, चांदीचे दर असे (‘जीएसटी’विना)

तारीख -- सोने प्रतितोळे -- चांदी प्रतिकिलो

२८ जानेवारी -- ५७ हजार ४०० -- ६९ हजार

१ फेब्रुवारी -- ५७ हजार ४०० -- ६९ हजार

४ फेब्रुवारी -- ५७ हजार -- ६९ हजार

१२ फेब्रुवारी -- ५७ हजार ४०० -- ६७ हजार

१७ फेब्रुवारी - ५७ हजार ३०० - ६७ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com