Gold Rate : सोन्याचा दर ५५ हजारांवर

Team Agrowon

राज्यात प्रसिद्ध जळगावच्या सुवर्ण बाजारात (Gold Market) सोन्या, चांदीच्या दरातही वाढ होत आहे.

Gold Rate | Agrowon

मंगळवारी (ता. १३) सोन्याच्या दराने ‘जीएसटी’सह ५५ हजार ६०० रुपयांचा टप्पा (प्रतितोळा) पार केला. तर चांदीनेही प्रतिकिलो ६८ हजार ४९५ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Gold Rate | Agrowon

चार डिसेंबरला सोने ५३ हजार ८०० प्रतितोळा, तर चांदी ६५ हजार प्रतिकिलो (जीएसटी विना) होती. ४ डिसेंबरला सोन्याच्या दरात प्रतितोळा तीन हजारांची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो साडेपाच हजारांची वाढ झाली होती.

Gold Rate | Agrowon

आगामी काळात सोन्याचे दर प्रतितोळा ६० हजारांचा टप्पा गाठेल, असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे, तो आता पूर्णत्वाकडे येत आहे.

Gold Rate | Agrowon

गेल्या महिन्यात सुरू झालेल्या लग्नसराईमुळे सोन्याला मोठी मागणी होत आहे. सुवर्ण व्यवसायिकांच्या अनुभवानुसार सोने, चांदीच्या दरात हवी तशी भाववाढ होत नव्हती.

Gold Rate | Agrowon

आता चांगला दर सोने, चांदीला मिळाला आहे. तो आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. २५ नोव्हेंबरला चांदीत तब्बल दीड हजारांची वाढ होऊन चांदी ६३ हजार ५०० पर्यंत पोचली होती.

Gold Rate | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon
click here