Agriculture Export : निर्यातीचे हब होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे

Agriculture Production : जिल्ह्यातील निर्यातीस वाव व प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सहकार्याने जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘एक्स्पोर्ट आउटरीच’ कार्यशाळा नियोजन भवनात झाली, त्या वेळी ते बोलत होते.
 agricultural export
agricultural export
Published on
Updated on

Akola News : जिल्ह्यात डाळ, सोया उत्पादनांसह विविध कृषी व इतर वस्तूंचे उत्पादन पाहता निर्यातीच्या क्षेत्रात मोठी संधी आहे. त्यानुसार अकोला जिल्हा हे ‘एक्स्पोर्ट हब’ होण्यासाठी विविध विभाग, उद्योजक, कृषी उत्पादक कंपन्या, व्यापाऱ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.

जिल्ह्यातील निर्यातीस वाव व प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सहकार्याने जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘एक्स्पोर्ट आउटरीच’ कार्यशाळा नियोजन भवनात झाली, त्या वेळी ते बोलत होते.

विदेश व्यापार महासंचालनालयाचे प्रतीक गजभिये, मुख्य पोस्ट अधीक्षक बी. व्ही. चव्हाण, बँक ऑफ महाराष्ट्रचे भगवान सुरशे, राजन ठवकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक संतोष बनसोड, ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन’चे अक्षय शाह, वस्तू व सेवा कर कार्यालयाचे ए. पी. अवचार, सहायक कौशल्य विकास आयुक्त द. ल. ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, निशांत पट्टेबहादूर, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे आदी उपस्थित होते.

 agricultural export
Banana Export : केळीच्या निर्यात वाढीचे संकेत

जिल्ह्यात डाक निर्यात केंद्र सुरू करण्यात आले असून, पॅकेजिंगपासून सर्व सुविधा उपलब्ध आहेत. येथील सुविधेसाठी केवायसी, कस्टम हाउस एजंटची गरज नाही. नोंदणी सोपी असून, मोठ्या निर्यातीला दरात सवलत दिली जाते. पोर्टलला ट्रॅकिंगची सोय आहे. अमेरिका, जपान, कॅनडा, ब्रिटन आदी सर्व देशांत उत्पादने पाठवता येतात, असे टपाल कार्यालयाचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

 agricultural export
Basmati Rice Export : बासमती तांदळाची निर्यात वाढणार? बंदरांवर हालचाली वाढल्या

जिल्ह्यात उद्योग-व्यवसायांना लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभाग कटिबद्ध असून, जिल्ह्यातील एक लाख २० हजार उमेदवारांचा डेटाबेस उपलब्ध आहे. उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळाची गरज तपासून त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

‘अपेडा’मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती श्री. किरवे यांनी दिली. श्री. शाह यांनी ‘इंडियन ट्रेड पोर्टल’ व ‘इंडियन बिझनेस पोर्टल’ची माहिती दिली. या वेळी तज्ज्ञांनी आयईसी कस्टम प्रक्रिया, एमएसएमई योजना, निर्यात कशी करावी, बायर-सेलर मीट, ईपीसीची भूमिका, वित्तीय साह्य मिळविण्याचे पर्याय ई-कॉमर्स आदींबाबत मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com