Basmati Rice
Basmati RiceAgrowon

Basmati Rice Export : बासमती तांदळाची निर्यात वाढणार? बंदरांवर हालचाली वाढल्या

Rice Export : भारताने बिगर बासमती तांदळाची निर्यात बंद केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या दराला फोडणी मिळाली. पण बासमती तांदळाला मागणी येत आहे. भविष्यात बासमती तांदळाला निर्यातीसाठी मागणी वाढू शकते.
Published on

Basmati Rice : पुणेः भारताने बिगर बासमती तांदळाची निर्यात बंद केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या दराला फोडणी मिळाली. पण बासमती तांदळाला मागणी येत आहे. भविष्यात बासमती तांदळाला निर्यातीसाठी मागणी वाढू शकते. हे गृहीत धरून तांदूळ निर्यातदारांनी बासमती तांदळाची जमवाजमव सुरु केल्याचं दिसतं. 

तसं पाहीलं तर बासमती तांदळाचे भाव बिगर बासमती तांदळापेक्षा जास्त असतात. त्यामुळे बासमीत तांदळाला फार मागणी येईल किंवा निर्यातीत मोठी वाढ होईल, असे वाटत नाही. पण एप्रिल ते जून या काळात बासमती तांदळाच्या निर्यातीत १२ टक्क्यांची वाढ झाली. विशेष वाणांच्या तांदळाची निर्यात भारतातून खूपच कमी प्रमाणात होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाची मागणी वाढल्यानंतर भारतातून निर्यात वाढली. पण यंदा भारताच्या पावसावर एल निनोचे सावट आहे. यामुळे देशातील बाजारात तांदळाचे दर वाढत गेले. दर वाढल्यानंतर सरकार मात्र जागे झाले. सरकारने २० जुलै रोजी तत्काळ बिगर बासमती पांढऱ्या तांदळाची निर्यात बंद केली. याचा फार मोठा परिणाम जागतिक तांदूळ बाजारावर झाला. तांदळाचे भाव अव्वाच्यासव्वा वाढत आहेत. अनेक आयातदार देशांना तांदूळही मिळत नाही.

जागतिक तांदूळ बाजारात भारताचे विशेष महत्व आहे. कारण जागतिक बाजारातील एकूण निर्यातीपैकी भारताचा वाटा तब्बल ४० टक्के असतो. तर भारताच्या एकूण निर्यातीत बिगर बासमती तांदूळ ४५ टक्के असतो. म्हणजेच केंद्र सरकारने ४५ टक्के निर्यात बंद केली. त्यामुळे बासमतीला मागणी वाढत आहे. बासमती तांदूळ बिगर बासमती तांदळाला पर्याय असू शकत नाही. पण बासमती तांदळाला मागणी वाढत आहे आणि भविष्यात मागणी आणखी वाढू शकते, असे निर्यातदारांनी सांगितले.

Basmati Rice
Basmati export : बासमती निर्यात दरात विक्रमी वाढ

केंद्र सरकारने बिगर बासमती तांदूळ निर्यातबंदीनंतर देशातील दर काहीसे कमी झाले. कमी आंतरराष्ट्रीय बाजारात भाववाढ झाली. यामुळे बासमती तांदळाला मागणी वाढू शकते, हे गृहीत धरून निर्यातदारांनी तांदूळ साठवण्यास सुरुवात केली. अनेक निर्यातदारांनी बंदाराच्या जवळ वेअरहाऊसेस भाडे तत्वार घेण्यास सुरुवात केल्याचे दिसते.

सध्या बंदरांवर तांदूळ निर्यातीसाठी कार्गोजची मागणी वाढल्याचे लाॅस्टीक कंपन्यांनी सांगितले. बंदरांवर कार्गोजची संख्या वाढलेली दिसते. तसेच बंदरावर माल साठवण्यासाठी वेअरहाऊसेसची विचारणाही होत आहे. तांदळाला निर्यातीसाठी मागणी येईल, अशी शक्यता निर्यातदार व्यक्त करत आहेत, असेही या कंपन्यांनी सांगितले. एल पी लाॅजिसायन्सच्या शिवम शाह यांनी बिझनेलाईनला दिलेल्या माहितीनुसार, बंदरांवर तांदूळ निर्यातीसंदर्भातील हालचाली वाढल्या आहेत. कंपनीच्या माध्यमातून वर्षाला ५ लाख टन बासमती तांदूळ निर्यात होत असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com