Ethanol Production : यंदाच्या हंगामात इथेनॉल उत्पादन वाढण्याची शक्यता

राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम (२०२२-२३) शेवटच्या टप्प्यात आला आहे. राज्यातील २१० कारखान्यांपैकी १५५ कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे.
Ethanol Production
Ethanol ProductionAgrowon

Sugar Crushing Season राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम (२०२२-२३) शेवटच्या टप्प्यात आला आहे. राज्यातील २१० कारखान्यांपैकी १५५ कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यावर्षी अनेक कारखान्यांनी गाळप (Sugarcane Crushing) क्षमतेत वाढ केल्यामुळे १५ एप्रिलच्यानंतर संपूर्ण राज्यातील कारखान्यांचे गाळप पूर्ण होईल, असे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे. (Ethanol Production)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेखर गायकवाड यांनी राज्यातील गाळप हंगामाची संदर्भातील माहिती दिली. गायकवाड यांच्या यांच्यामाहितीनुसार, यंदाच्या हंगामात आजअखेर १०४२ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

मागील वर्षीच्या याच कालवधिच्या तुलनेत ऊस गाळपाचा वेग अधिक आहे. गेल्या वर्षी १५ जूनपर्यंत गाळप हंगाम लांबला होता. त्यामुळे ऊस उत्पादकांना मनस्ताप सहन करावा लागला होता, असेही गायकवाड यांनी सांगितले.

Ethanol Production
Ethanol Production : पुढील वर्षासाठी इथेनॉलचा ‘कॅरी ओव्हर स्टॉक’

या हंगामाची प्रमुख वैशिष्ट्ये -

यंदाच्या हंगामात आजपर्यंत कधी नव्हे एवढ्या २१० कारखान्यांनी गाळप केले. बंद पडलेले २४ कारखाने या हंगामात सुरू करण्यात यश आले. तसेच मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षी गाळपाचा वेग फार जास्त राहिला.

दररोजची गाळप क्षमता दीड लाख टनांनी वाढल्यामुळे साधारणपणे १५ एप्रिलच्यापुढे साखर कारखाने सुरू राहण्याची शक्यता नाही. यंदाच्या हंगामात अनेक साखर कारखान्यांनी त्यांची वैयक्तीक गाळप क्षमता वाढवली आहे.

Ethanol Production
Ethanol Supply : राज्यातून ३६ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा

इथेनॉल उत्पादन वाढण्याची शक्यता -

मागील हंगामातील ११० कोटी लिटर्सच्या तुलनेत यावर्षी १३० कोटी लिटर इथेनॉल उत्पादन होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉल ब्लेंडींग धोरणाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.

कारण आजअखेर ९२ टक्के शेतकऱ्यांचे पैसे देवून झाले आहेत. परिणामी साखरेचे दर फारसे न वाढतासुध्दा शेतकऱ्यांना पैसे देणे शक्य झाले. इथेनॉलमधून नियमितपणे शेतकऱ्यांना आणि कारखान्यांना पैसे मिळू शकले, हे याचे मुख्य कारण असल्याचे गायकवाड म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com