Ethanol Production : पुढील वर्षासाठी इथेनॉलचा ‘कॅरी ओव्हर स्टॉक’

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट गाठण्याचा एक भाग म्हणून पुढील वर्षासाठी इथेनॉलचा कॅरी-ओव्हर स्टॉक तयार करण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार आहे.
Ethanol Production
Ethanol ProductionAgrowon

Ethanol News कोल्हापूर : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण (Ethanol Blending) करण्याचे उद्दिष्ट गाठण्याचा एक भाग म्हणून पुढील वर्षासाठी इथेनॉलचा कॅरी-ओव्हर स्टॉक (Ethanol Stock) तयार करण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार आहे.

केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या (Union Ministry Of Food) सूत्रांनी ही माहिती दिली. २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढले आहे. तेल विपणन कंपन्यांनी देशातील ३१ शहरांमधील सुमारे १०० आउटलेटमध्ये इ-२० इंधनाचे वितरण सुरू केले आहे. याचे प्रमाण देशात वाढल्यास इथेनॉलची गरज लागणार आहे.

Ethanol Production
Ethanol Production : इथेनॉलमुळे कारखान्यांच्या उत्पन्नात १२ टक्क्यांपर्यंत वाढ शक्य

साखरेप्रमाणे, २०२३-२४ इथेनॉल वर्षासाठी (डिसेंबर-नोव्हेंबर) तेल विपणन कंपन्या आणि डिस्टिलरीजसह इथेनॉलचा कॅरीओव्हर स्टॉक तयार करण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी अधिक साखर इथेनॉलकडे वळवली जाईल.

यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार आहेत. केंद्राने सरकारने २०२२-२३ वर्षात इथेनॉल मिश्रणाचे १२ टक्के लक्ष्य ठेवले आहे, तर पुढील वर्षासाठी १५ टक्के मिश्रणाचे लक्ष्य ठेवले आहे.

Ethanol Production
Ethanol Production : देशाची इथेनॉल क्षमता वर्षाअखेर २५ टक्क्यांनी वाढणार

फेब्रुवारीअखेरपर्यंत सुमारे १२० कोटी लिटर इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले गेले आहे. सध्या सतत १२ टक्के मिश्रण करत आहोत. इथेनॉलची उपलब्धता आणि उत्पादन क्षमता या वर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे, असे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

चालू वर्षासाठी, सुमारे ५० लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी ३६ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यात आली होती.

Ethanol Production
Ethanol Production : इथेनॉलमुळे कारखान्यांच्या उत्पन्नात १२ टक्क्यांपर्यंत वाढ शक्य

अतिरिक्त १५० कोटी लिटर इथेनॉल आवश्‍यक

पुढील वर्षी १५ टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त १५० कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता असेल. या वर्षी फेब्रुवारीपर्यंत इथेनॉल उत्पादन क्षमता १०४० कोटी लिटरवर गेली आहे. सरकार व्याज सवलत योजनेअंतर्गत इथेनॉल क्षमता निर्मितीला प्रोत्साहन देत आहे.

सरकारने २४३ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. बँकांनी २० हजार ३३४ कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली आहेत. त्यापैकी ११ हजार ९३ कोटी रुपये वितरित केले गेले आहेत.

गेल्या आठवड्यात, सरकारने आगामी प्रकल्पांचा आढावा घेतला. पुढील ९ ते १० महिन्यांत सुमारे २५० ते ३०० कोटी लिटर इथेनॉल क्षमता निर्माण होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com