Agricultural Electricity : कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करा

वणी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाघाची दहशत निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शेती कामावर झाला असून आतापर्यंत वाघाने तिघांवर हल्ले केले आहेत.
Agricultural Electricity
Agricultural ElectricityAgrowon
Published on
Updated on

यवतमाळ : वणी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाघाची दहशत (Tiger Terror) निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शेती कामावर झाला असून आतापर्यंत वाघाने तिघांवर हल्ले केले आहेत. त्यात दोघांचा बळी गेला. हा प्रकार लक्षात घेता कृषिपंपांना (Agriculture Pump) दिवसा बारा तास वीजपुरवठा (Electricity Supply) करावा अशी मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Agricultural Electricity
Crop Insurance : विम्यासाठी ‘स्वाभिमानी’ची कृषी कार्यालयावर धडक

बोदकुरवार यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना मागणी संदर्भात निवेदन दिले. निवेदनानुसार, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांत कृषिपंपांना दिवसा बारा तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील हे जिल्हे वनव्याप्त आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांची सातत्याने या भागात दहशत राहते. त्याचा शेती कामावर परिणाम होतो ही बाब लक्षात घेत या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देत दिवसा वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वणी तालुक्यात वाघांचा वावर वाढला आहे. वणी विधानसभा मतदारसंघात तब्बल १२ वाघांचा संचार आहे. वणीच्या सभोवताली असलेल्या ग्रामीण भागात वाघाचा मुक्तसंचार सुरू आहे. वेकोली (वेस्टर्न कोलफिल्ड लिमीटेड) खान बाधित क्षेत्रात ऑस्ट्रेलियन बाभळीची झाडे वाढली आहेत. या झाडांमध्ये वाघांचा अधिवास आहे. मागील पंधरा दिवसात वाघाने हल्ला करून दोघांचा बळी घेतला तर एकाला जखमी केले. हा प्रकार लक्षात घेता वणी विधानसभा मतदारसंघातील तीन तालुक्यात दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार बोदकुरवार यांनी केली आहे.

Agricultural Electricity
Farmer Loan Waive : ‘कर्जमुक्ती’च्या यादीत १२ हजार ९४२ शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com