College of Agriculture : बारामती कृषी महाविद्यालयाचे खो-खो स्पर्धेत यश

येथील ॲग्रिकल्चरल डेव्हपमेंट ट्रस्ट संचलित बारामती कृषी महाविद्यालयातील खेडाळूंनी आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
College of Agriculture
College of AgricultureAgrowon
Published on
Updated on

माळेगाव, जि.पुणे ः येथील ॲग्रिकल्चरल डेव्हपमेंट ट्रस्ट संचलित बारामती कृषी महाविद्यालयातील (College of Agriculture) खेडाळूंनी आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आयोजित केलेल्या खो-खो स्पर्धा कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, गुजाळवाडी (ता. संगमनेर) येथे नुकत्याच पार पडल्या.

College of Agriculture
Crop Damage : गव्यांच्या कळपांकडून आजऱ्यात पीक नुकसान

अंतिम सामन्यात बारामती कृषी महाविद्यालयाच्या संघाने पानीव कृषी महाविद्यालय संघाचा पराभव करीत विजेतेपद संपादन केले. या यशस्वी संघामध्ये कर्णधार अक्षय नाझरकर, दिनेश कशाळे , करण पाडळे, तुषार जंजिरे, वैभव नलवडे, कार्तिक डफळ, प्रद्नेश जाधव, दिग्विजय भोसले, रुद्रवत कुतवळ , श्रीहरी कदम, आदित्य मोहिते, सौरभ कोळी, योगेश पाठक, सौरभ निमते  इत्यादी खेळाडूंचा समावेश होता.  क्रीडा शिक्षक दत्तात्रय आदलिंगे, प्रा.पूनम घार्गे, राजेंद्र कर्णे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

विजेत्या खेळाडूंचे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश  नलावडे, समन्वयक प्रशांत तनपुरे, एस.पी.गायकवाड, उपप्राचार्य जया तिवारी आदींनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com