Electricity Connection : तातडीच्या वीजजोडणीचा आठ हजार ग्राहकांना लाभ

Mahavitaran : नवीन वीजजोडणी तातडीने घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात चोवीस तासांत, तर ग्रामीण भागात ४८ तासांत कनेक्शन देण्याच्या महावितरणच्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Electricity
ElectricityAgrowon
Published on
Updated on

Nagar News : नवीन वीजजोडणी तातडीने घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात चोवीस तासांत, तर ग्रामीण भागात ४८ तासांत कनेक्शन देण्याच्या महावितरणच्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महावितरणमधून दिलेल्या माहितीनुसार राज्यात जुलै महिन्यात एकूण ८०६३ वीज ग्राहकांना तातडीची वीजजोडणी देण्यात आली आहे.

वीजजोडणीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचा आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आला होता. त्यानुसार महावितरणने जून महिन्यात राज्यात दहा दिवसांत एक लाख नवीन घरगुती वीज वीजजोडणी दिली. आता नव्याने तातडीने वीजजोडणीसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात २४ तासांत तर ग्रामीण भागात ४८ तासांत वीजकनेक्शन देण्याचे काम कंपनीने सुरू केले आहे. महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम चालू आहे.

Electricity
Agriculture Electricity : रोहित्र नादुरुस्तीच्या प्रमाणात घट

ग्राहकांनी नव्या वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात. त्यानुसार शहरी भागातील ज्या ग्राहकांनी शुल्क भरले त्यांना चोवीस तासांत वीजजोडणी देण्यावर भर देण्यात आला.

राज्यभरात अशा एकूण ३७७५ ग्राहकांना जुलै महिन्यात लाभ झाला. महावितरणकडे अर्ज केल्यानंतर सूचना मिळाल्यावर तातडीने शुल्क भरणाऱ्या ५१० ग्राहकांना अर्ज केल्याच्या दिवशीच नवीन कनेक्शन मिळाले. अर्ज केल्यानंतर आपल्या सोयीने शुल्क भरल्यानंतर ४८ तासांत कनेक्शन मिळणाऱ्या ग्राहकांची संख्या ३१६२ आहे.

शेतकऱ्यांनाही तातडीने वीजजोडणी

कृषी ग्राहकांना वीज कनेक्शन देणे हे तुलनेने अवघड असते. शेतामध्ये दूरवर असलेल्या विहिरीवरील कृषिपंपासाठी वीज कनेक्शन देण्यासाठी विजेचा खांब, वायर, ट्रान्स्फॉर्मर अशा पायाभूत सुविधा अनेकदा उभाराव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना जोडणी मिळण्यास विलंब लागतो.

Electricity
Electricity Bills : वीजबिल रोखीने पाच हजार रुपयांपर्यंतच भरता येणार

ही समस्या सोडविण्यासाठी महावितरणने गेल्या वर्षभरात मोहीम राबविली. त्यातून निर्माण झालेल्या पायाभूत सुविधांमुळे शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी कनेक्शन देण्याचाही वेग वाढला आहे. जुलै महिन्यात राज्यात १२२७ शेतकऱ्यांना झटपट वीज जोडणी मिळाली.

त्यापैकी ७४ शेतकऱ्यांना अर्ज केल्याच्या दिवशीच, तर ४९३ शेतकऱ्यांना शुल्क भरल्यानंतर २४ तासांत वीज कनेक्शन मिळाले. अर्ज केल्यानंतर ४८ तासांत कनेक्शन मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ११७ आहे, तर ५४३ शेतकऱ्यांना शुल्क भरल्यानंतर ४८ तासांत वीजजोडणी मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com