Agriculture Electricity : रोहित्र नादुरुस्तीच्या प्रमाणात घट

Electricity : छत्रपती संभाजीनगर परिमंडळात ५२ हजार ३५१ वितरण रोहित्रे होती. या मोहिमेनंतर जूनमध्ये नवीन ७८०० रोहित्रांची प्रणालीत नोंद करताच ही संख्या ६० हजार १५१ वर पोहोचली आहे.
Agriculture Electricity
Agriculture ElectricityAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात वितरण रोहित्रांच्या नादुरुस्तीचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांच्या पुढाकारातून रोहित्रांचा प्रणालीत समावेश, वीजचोरीविरुद्ध धडक मोहीम व नियमित देखभाल-दुरुस्ती या त्रिसूत्रीद्वारे रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण कमी झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी रोहित्र सुस्थितीत असणे आवश्यक असते. शेतीपंपासाठी विजेचा वापर,‍ वीजवाहिन्यांवर आकडे, बिलाच्या थकबाकीसाठी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही अनधिकृत वीजवापर, देखभाल व दुरुस्तीचा अभाव तसेच पावसाळ्यात वीज कोसळणे ही रोहित्र नादुरुस्त होण्याची प्रमुख कारणे आहेत. मुख्य अभियंता डॉ. केळे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर घेतलेल्या पहिल्याच आढावा बैठकीत त्यांनी परिमंडळातील रोहित्र नादुरुस्तीची गांभीर्याने ‍दखल घेतली.

Agriculture Electricity
Electricity Tower : वीज मनोऱ्यामुळे बाधित शेतकऱ्यांचे होणार पंचनामे

थ्री फेज व सिंगल फेज रोहित्राच्या नादुरुस्तीचे प्रमाण लक्षणीय असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत क्षेत्रीय अभियंत्यांशी चर्चा केली असता लगतच्या काही दिवसांत अनेक ठिकाणी नवीन रोहित्रे बसवलेली आहेत, परंतु त्यांची महावितरणच्या प्रणालीत (नेटवर्क डाटा मॅनेजमेंट) नोंद नसल्याचे आढळून आले. मुख्य अभियंता डॉ. केळे यांनी तीन दिवसांत नवीन रोहित्रांचा समावेश प्रणालीत करण्याचे निर्देश दिले.

छत्रपती संभाजीनगरमध्येही रोहित्रे प्रणालीत आणताच त्यांची संख्याही वाढली, परिणामी रोहित्र नादुरुस्तीचे पूर्वीच्या संख्येनुसार असलेले प्रमाणही आपोआप घटले. वीजचोरीमुळे ‍वितरण रोहित्रावर अधिकचा भार येऊन ते नादुरुस्त होते. त्यामुळे परिमंडळात वीजचोरीविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश डॉ. केळे यांनी दिले आहेत.

त्यानुसार प्रत्येक महिन्यातील किमान तीन दिवस केवळ वीजचोरी पकडण्याची मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जूनमध्ये जवळपास ३३१९ जणांवर कारवाई करत २ कोटींची वीजचोरी उघडकीस आणण्यात महावितरणला यश मिळाले.

Agriculture Electricity
Electricity Bill : पासष्ट टक्के ग्राहकांकडून ऑनलाइन वीजबिल भरणा

वितरण रोहित्रे पोहोचली ६० हजार १५१ वर

छत्रपती संभाजीनगर परिमंडळात ५२ हजार ३५१ वितरण रोहित्रे होती. या मोहिमेनंतर जूनमध्ये नवीन ७८०० रोहित्रांची प्रणालीत नोंद करताच ही संख्या ६० हजार १५१ वर पोहोचली आहे.

पाच वर्षांपूर्वी डॉ. मुरहरी केळे हे अकोला येथे कमी कालावधीसाठी मुख्य अभियंतापदी असतानाही तेथे ३ ते साडेतीन हजार रोहित्रे प्रणालीत कमी असल्याचे त्यांना आढळले होते.

अकोल्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अशीच मोहीम राबवून रोहित्रे प्रणालीत समाविष्ट करण्यात आली होती. त्यावरून डॉ. केळे यांनी हा उपक्रम छत्रपती संभाजीनगर परिमंडळातही राबविण्याचा निर्णय घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com