Farmer Income : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा प्रयत्न

कृषी आणि रोजगार हमी योजना या विभागामार्फत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येते आहे.
Farmer Income
Farmer IncomeAgrowon
Published on
Updated on

औरंगाबाद : कृषी आणि रोजगार हमी योजना (Agriculture And Employment Guarantee Scheme) या विभागामार्फत शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer Income) वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी (Agriculture Scheme Implementation) करण्यात येते आहे. अशा योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन रोजगार हमी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी केले.

Farmer Income
Farmers Income: आठ वर्षात लाखांवर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट

समृद्ध शेतकरी विचारमंथन कार्यशाळेच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (ता. ७) एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मीना, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंदार वैद्य, कृषी सहसंचालक दिनकर जाधव, राज्य प्रशिक्षण समन्वयक नीलेश घुगे कृषी अधिकारी, कृषी सहायक यांची उपस्थिती या कार्यशाळेत होती.

Farmer Income
Farmer Income : अजब दावे, गजब सरकार

श्री. नंदकुमार म्हणाले, की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत रोहयो आणि कृषी विभागाचे अधिकारी यांना प्रत्यक्ष अनुभव, शेतकऱ्यांची मागणी, नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने उत्पन्नवाढ करण्यास मदत करावी. संवादाने विश्‍वास निर्माण करून शेतकरी बांधवांचे जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न दोन्ही विभागांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शेतीबरोबरच इतर जोडव्यवसाय करण्याबाबत अधिकारी कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले.

कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले म्हणाले, की शेतीसाठी पाण्याचा सुयोग्य वापर पीक पद्धतीत बदल, हवामानानुसार पीक रचना, योग्य बाजारभावासाठी उत्पन्नाची साठवणूक, शेततळे इत्यादी उपाययोजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी शासनाचा कृषी विभाग विविध उपक्रम राबवीत आहेत. योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी अधिकारी व कर्मचारी यांची आहे. ते काम प्रभावीपणे करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com