E-Peek Pahani : दोन लाख हेक्टरवरील पिकांची ई-पीकपाहणी

Kharif Season : अद्याप यंदाच्या पेरणी क्षेत्रापैकी ३ लाख ९ हजार ९७७ हेक्टरवरील पिकांची व एकूण शेतकरी खातेदारांपैकी ३ लाख ९२ हजारांवर शेतकऱ्यांकडून ई-पीकपाहणी करायची राहिली आहे.
E-Peek Pahani
E-Peek PahaniAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदाच्या यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात शनिवार (ता. २६) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ५ लाख ४६ हजार ६५९ पैकी १ लाख ५४ हजार ४८१ शेतकरी (२८.२६ टक्के) खातेदारांनी २ लाख १६७ हेक्टर (३२.९५ टक्के) क्षेत्रावरील पिकांची ई-पीकपाहणी केली आहे.

अद्याप यंदाच्या पेरणी क्षेत्रापैकी ३ लाख ९ हजार ९७७ हेक्टरवरील पिकांची व एकूण शेतकरी खातेदारांपैकी ३ लाख ९२ हजारांवर शेतकऱ्यांकडून ई-पीकपाहणी करायची राहिली आहे. खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरणी क्षेत्राची योग्य आकडेवारी (रियल टाइम डाटा) उपलब्ध व्हावा. त्यानुसार शासनास धोरणे ठरविता यावीत. त्यादृष्टीने ई-पीकपाहणी प्रकल्प राबविला जात आहे.

E-Peek Pahani
E Peek Pahani : पिक विमा मिळवायची असल्यास आपली ई-पीक पाहणी करून घ्या ; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

परभणी जिल्ह्यातील शेती खात्यांचे एकूण क्षेत्र ६ लाख ७ हजार ७३४ हेक्टर आहे. एकूण शेतकरी खातेदारांची संख्या ५ लाख ४६ हजार ६५९ आहे. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे खरिपाची पेरणी लांबली. त्यामुळे ई-पीकपाहणी अॅपद्वारे पीकपेरा नोंदणीस उशीर झाला. खरिपाचे पेरणी क्षेत्र अद्याप अंतिम करण्यात आलेले नाही. गुरुवार (ता. २४)पर्यंत जिल्ह्यात ५ लाख ६ हजार १७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

शनिवार (ता. २६)पर्यंत जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार ४८१ शेतकरी खातेदारांनी ई-पीकपाहणी केली. त्यात १ लाख ९१ हजार १ हेक्टर क्षेत्रावरील पिके पाहणी चालू पड क्षेत्र ३ हजार हेक्टर मिळून ई-पीकपाहणी झालेल्या खात्यांचे एकूण क्षेत्र २ लाख हेक्टर आहे.

E-Peek Pahani
E-Peek Pahani : ई-पीक पाहणी मोहिमेला प्रतिसाद मिळेना

महसूल, कृषी विभाग, ग्रामविकासमार्फत शेतकऱ्यांमध्ये ई-पीकपाहणी बाबत पुरेशा प्रमाणात जागृती केलेली दिसत नाही. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांना ई-पीकपाहणीचे महत्त्व अद्याप समजलेले दिसत नाही. दुर्गम, आडवळणाच्या अनेक गावशिवारात इंटरनेट कनेक्टिव्हिटी व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे अडचणी येत असल्याने जिल्ह्यातील ई-पीकपाहणी रखडत चालली आहे.

परभणी जिल्हा ई-पीकपाहणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका एकूण शेतकरी खातेदार एकूण क्षेत्र पीक पाहणी खातेदार पीक पाहणी क्षेत्र क्षेत्र टक्केवारी

परभणी ९५९३८ १०९९६५ २१६५२ २९४२९ २६.७६

जिंतूर ९१३५८ ११९१५७ १९७८४ ३०१०१ २५.२६

सेलू ५९८७५ ६८६१२ १७६८९ २३४०१ ३४.११

मानवत ३९४५९ ४८१३६ १४२५४ १९५९० ४०.७०

पाथरी ४८५३ ५२९३७ २००७३ २५६६९ ४८.४९

सोनपेठ ३२६८६ ३६९५४ १५४५७ १९५९२ ५३.०२

गंगाखेड ७२०५९ ६३२३० १२७४३ १५४७७ २४.४८

पालम ४८२४४ ४७९७६ १४३४६ १६००७ ३३.३६

पूर्णा ६२१८७ ६०७६३ १८४८३ २०८९७ ३४.३९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com