Jalgaon News : फैजपूर, ता. यावल येथील महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १९) दुपारी पालिकेच्या सभागृहात झाली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सूचना केल्या.
या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रधानमंत्री किसान योजना, ई-पीकपाहणीचे काम दहा टक्के झाले असून, ते कशाप्रकारे वाढवता येईल, त्याला वाढविण्यासाठी कोणकोणाची मदत घेता येईल, या आधारावर शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांचा नुकसान झाल्यास विमा कंपनीमार्फत माहिती मिळू शकते.
निवडणूक आयोगाचा मतदारांना प्रत्येक घरी जाऊन भेटून कागदपत्र तपासणी करण्यात येत आहे. जे मतदार मृत झाले असतील, त्यांची नावे वगळण्यात यावी. जे बाहेरगावी असतील त्यांनी आपली नावे एकाच मतदार संघात ठेवावी. फैजपूर विभागाने चांगगली कामगिरी केल्याचे गौरोदगार काढले. संजय गांधी, इंदिरा गांधी योजना प्रभावीपणे राबवली जाईल.
तसेच दिव्यांग पेन्शन यांना रोख रक्कम स्वरूपात वेळेवर कोणताही विलंब न होता मिळाली पाहिजे. शिधापत्रिकांवर बारा अंकी क्रमांकाच्या शिधापत्रिका सर्व विभागातून काढण्यात आल्या आहेत. तसेच भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक कामे व्हायला हवी, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या वेळी फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग, रावेर तहसीलदार बंडू कापसे, यावल नायब तहसीलदार संतोष विनंते, यावल निवडणूक शाखा नायब तहसीलदार रशीद तडवी, यावल व रावेर तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.
पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने सध्यस्थितीत भुसावळच्या मुख्याधिकाऱ्यांकडे प्रभारी पदभार आहे. नियमित मुख्याधिकारी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांच्या अत्यावश्यक कामे होत नाही. तसेच अवेळी पाणीपुरवठा, नियमित साफसफाईचा प्रश्न निर्माण होत आहे.अनेक कामे खोळंबून आहेत. या समस्या सोडविण्यासाठी पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा, अशी मागणी पत्रकारांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली अाहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.