E-Peek Pahani
E-Peek PahaniAgrowon

E-Peek Pahani : ई-पीक पाहणी मोहिमेला प्रतिसाद मिळेना

E-Peek Pahani Online Maharashtra : शेतकऱ्यांनी खरिपातील पीक पेरा नोंदणीविण्यासाठी जिल्हा प्रशासन कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. परंतु या मोहिमेला अद्याप गती आली नसल्याचे दिसून येत आहे.
Published on

Nanded News : नांदेड जिल्ह्यात ई-पीक पाहणी मोहिमेंतर्गत खरिपातील पीक पेरा नोंदणीची सुरुवात एक जुलैपासून झाली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना पेरा नोंदणीचे आवाहन केले आहे. परंतु मागील पन्नास दिवसात केवळ आठ टक्क्यांनुसार ५७ हजार ४७४ खातेदार शेतकऱ्यांनी पेरा नोंदणी केली आहे. यामुळे या मोहिमेकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.

नांदडे जिल्ह्यात आठ ऑगस्टपर्यंत खरिपात एकूण सात लाख ५५ हजार ६२६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. परंतु मागील पन्नास दिवसात जिल्ह्यातील नऊ लाख ५२ हजार ६२६ खातेदारांपैकी ८.७१ टक्क्यांनुसार ५७ हजार ४७४ खातेदार शेतकऱ्यांनी ६५ हजार ८४५ हेक्टर क्षेत्रासाठी पीक पेरा नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांनी खरिपातील पीक पेरा नोंदणीविण्यासाठी जिल्हा प्रशासन कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. परंतु या मोहिमेला अद्याप गती आली नसल्याचे दिसून येत आहे. पेरा नोंदणीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी विविध माध्यमातून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोहिमेत सहभागी होऊन पीक पेरा नोंदणीसाठी आवाहन केले आहे.

जिल्ह्यात साडेनऊ लाख खातेदार

जिल्ह्यात एकूण १० लाख १६ हजार ९३८ हेक्टर कृषीचे क्षेत्र आहे. तर नऊ लाख ५२ हजार ६२६ एकूण खातेदार आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामात सात लाख ५५ हजार ६२६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यापैकी ५७ हजार ४७४ खातेदार शेतकऱ्यांनी ६५ हजार ८४५ हेक्टर क्षेत्रासाठी ई-पीक पाहणी मोहिमेंतर्गत पीक पेरा नोंदणी केली आहे. याची टक्केवारी केवळ ८.७१ टक्के असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्राने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com