E Peek Pahani : तीन लाखावर शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणी करणे बाकी

Kharif Season : परभणी जिल्ह्यात यावर्षीच्या (२०२३)खरीप हंगामात ई पीक पाहणी ची प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे.
E Peek Pahani
E Peek PahaniAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्ह्यात यावर्षीच्या (२०२३)खरीप हंगामात ई पीक पाहणी ची प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. ई पीक पाहणी झाली आहे. शनिवार (ता. २) पर्यंत ५ लाख ४६ हजार ६५९ पैकी २ लाख २ हजार २९१ शेतकरी खातेदारांनी (३७ टक्क्के) एकूण २ लाख ६१ हजार २७७ हेक्टर (४२.९९ टक्के) क्षेत्रावरील पिकांची ई पाहणी केली आहे.

यावर्षीच्या पेरणीपैकी २ लाख ४४ हजार ९०० हेक्टरवरील पिकांची व एकूण शेतकरी खातेदारांपैकी ३ लाख ४४ हजार ३६८ शेतकऱ्यांनी अद्याप ई पीक पाहणी बाकी आहे.ई पीक पाहणी बाबतीत अनेक शेतकरी उदासीन आहेत.त्यामुळे ई पीक पाहणी क्षेत्र व पेरणी क्षेत्र यांच्यात मोठा फरक दिसत आहे.

E Peek Pahani
Crop Damage : पावसाअभावी पिके हातची जाण्याची वेळ

परभणी जिल्ह्यातील शेती खात्यांचे एकूण क्षेत्र ६ लाख ७ हजार ७३४ हेक्टर आहे. एकूण शेतकरी खातेदारांची संख्या ५ लाख ४६ हजार ६५९ आहे. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे खरिपाची पेरणी लांबली. त्यामुळे ई पीक पाहणी अॅपव्दारे पीक पेरा नोंदणीस उशीर झाला. खरिपाचे पेरणी क्षेत्र अद्याप अंतिम करण्यात आलेले नाही.

गुरुवार (ता. २४) पर्यंत जिल्ह्यात ५ लाख ६ हजार १७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शनिवार (ता. २) पर्यंत जिल्ह्यातील २ लाख २ हजार २९१ शेतकरी खातेदारांनी ई पीक पाहणी केली. त्यात २ लाख ५७ हजार ५११ हेक्टर क्षेत्रावरील पीके पाहणी चालू पड क्षेत्र ३ हजार ७६६ हेक्टर मिळून ई पीक पाहणी झालेल्या खात्यांचे एकूण क्षेत्र २ लाख ६१ हजार २७७ हेक्टर आहे.

E Peek Pahani
Crop Damage : माना टाकलेली पिके बघवेना, शेतकरी फिरकेना

ई पीक पाहणी झालेल्या खातेदारांची एकूण खातेदारांशी टक्केवारी ३७ टक्के आहे. पीक पाहणी झालेल्या खात्यांची एकूण खात्यांच्या क्षेत्राची टक्केवारी ४२.९९ टक्के आहे. विविध पिकांच्या पेरणी क्षेत्राची योग्य आकडेवारी (रियल टाईम डाटा) उपलब्ध व्हावा. त्यासाठी ई पीक पाहणी प्रकल्प राबविला जात आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांकडून दुर्लक्ष्य केले जात आहे.

परभणी जिल्हा ई पीक पाहणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका एकूण शेतकरी खातेदार एकूण क्षेत्र पीक पाहणी खातेदार पीक पाहणी क्षेत्र क्षेत्र टक्केवारी

परभणी ९५९३८ १०९९६५ २९७३९ ४०३८१ ३६.७२

जिंतूर ९१३५८ ११९१५७ २८१९२ ४२३४२ ३५.५३

सेलू ५९८७५ ६८६१२ २१३५४ २८२५० ४१.१७

मानवत ३९४५९ ४८१३६ १७३८१ २३८९७ ४९.६५

पाथरी ४८५३ ५२९३७ २३६१२ ३०१०९ ५६.८८

सोनपेठ ३२६८६ ३६९५४ २२३५४ २२३९३ ६०.६०

गंगाखेड ७२०५९ ६३२३० १८६८२ २२४४१ ३५.४९

पालम ४८२४४ ४७९७६ १९८३८ २२१७९ ४१.१२

पूर्णा ६२१८७ ६०७६३ २५८०४ २९२८१ ४८.१९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com