नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा (Parliament Winter Session) प्रस्तावित मुहूर्त पुढे जाणार हे निश्चित झाले असून, नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा किमान दोन आठवड्यांनी पुढे म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे अधिवेशन होईल, असे संसदीय सचिवालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. येत्या ५ किंवा ७ डिसेंबरपासून हे अधिवेशन सुरू करून डिसेंबर अखेरपर्यंत ते चालविण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगितले जाते. गुजरातच्या निवडणुकीसाठी (Gujarat Election) भाजप मंत्री व नेत्यांची ‘ड्यूटी’ लावण्यात आल्याने संसदीय अधिवेशनाचा मुहूर्त यंदा पुढे गेल्याची चर्चा आहे.
हिवाळी अधिवेशन संसदीय परंपरा व प्रथेनुसार नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते व डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत समाप्त होते. यंदा गुजरात निवडणुकीमुळे त्याला छेद दिला जाण्याची चिन्हे आहे. गुजरातची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे हे गृहराज्य असल्याने तेथील विजय-मोहिमेत भाजप कोणतीही कसर बाकी ठेवू इच्छित नाही.
१८७ जागांच्या गुजरात विधानसभेसाठी १ व ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतरच संसदीय अधिवेशन होऊ शकते. सचिवालय सूत्रांच्या माहितीनुसार, संसदीय अधिवेशनाची अधिसूचना किमान १५ दिवस निघणे आवश्यक असते. ती अद्यापपर्यंत निघालेली नाही. साहजिकच या महिन्यात अधिवेशनाला सुरुवात होण्याची शक्यता नाही.
गुजरातच्या प्रचारात भाजपने सारी शक्ती पणाला लावली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये यंदा जोर लावला आहे. राज्याच्या ग्रामीण भागात काँग्रेसचे पक्षसंघटन मजबूत आहे. त्यामुळे भाजपला दोन आघाड्यांवर लढावे लागत आहे. मोदी व शहा यांना गुजरातमध्ये कोणतीही जोखीम नको आहे. त्यादृष्टीने भाजप खासदार, केंद्रीय मंत्री यांच्या प्रचाराचे वेळापत्रक दिल्लीतून निश्चित करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.