Gujarat FRP Pattern : ‘एफआरपी’चा गुजरात पॅटर्न निघाला फुसका

गुजरातमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमीऐवजी तीन-चार तुकड्यांमध्ये ‘एफआरपी’ची रक्कम दिली जात आहे. हा बोलबाला झालेला गुजरात पॅटर्न फुसका निघाल्याची टीका साखर उद्योगातून होत आहे.
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon
Published on
Updated on

पुणे ः गुजरातमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Gujarat Sugarcane FRP) एकरकमीऐवजी तीन-चार तुकड्यांमध्ये ‘एफआरपी’ची रक्कम (FRP Payment) दिली जात आहे. हा बोलबाला झालेला गुजरात पॅटर्न (Gujarat FRP Pattern) फुसका निघाल्याची टीका साखर उद्योगातून (Sugar Industry) होत आहे.

कायद्याप्रमाणे १४ दिवसांत ‘एफआरपी’प्रमाणे पूर्ण पेमेंट करण्याचे बंधन कारखान्यांवर आहे. मात्र गुजरातमधील शेतकऱ्यांना तेथील साखर कारखान्यांनी अद्यापही पूर्ण एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) दिलेले नाहीत. तुकड्या तुकड्यांमध्ये एफआरपी देण्याची पध्दत ‘गुजरात पॅटर्न’मध्ये आहे.

Sugarcane FRP
Sugarcane FRP: छत्रपती’चा अंतिम ऊस दर २५०० रुपये प्रतिटन

मात्र तुकडे करूनही यंदा गुजरातमधील शेतकऱ्यांना केवळ ७० टक्के एफआरपी मिळालेली आहे. थकीत ‘एफआरपी’चे एक हजार १८० कोटी रुपये अजूनही दिलेले नाहीत. या उलट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ९८.५ टक्के एफआरपी दिली आहे.

“देशात ऊस ‘एफआरपी’पोटी यंदा सर्वाधिक रक्कम महाराष्ट्राने दिली आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत दिलेल्या ‘एफआरपी’ची रक्कम ४२ हजार ६७१ कोटी रुपये इतकी आहे. अद्याप केवळ ६३९ कोटी रुपये देणे बाकी आहेत. शेतकऱ्यांची थकीत रक्कम देण्यासाठी साखर कारखान्यांवर कारवाई करण्यातही राज्याने आघाडी घेतली आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

Sugarcane FRP
FRP : नांदेड विभागात थकले ‘एफआरपी’ चे दीडशे कोटी

महाराष्ट्राखालोखाल सर्वाधिक एफआरपी उत्तर प्रदेशने दिली आहे. आतापर्यंत तेथे ३० हजार ९०९ कोटी रुपये ‘एफआरपी’पोटी देण्यात आले आहेत. मात्र चार हजार २९२ कोटी रुपये अजूनही थकीत आहेत. तमिळनाडूतील शेतकऱ्यांना ‘एफआरपी’पोटी अद्याप २२१ कोटी, कर्नाटकमधील शेतकऱ्यांना १९६ कोटी रुपये अद्याप मिळालेले नाहीत.

तमिळनाडूतील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील एफआरपी थकविलीच; पण आधीच्या हंगामातील एक हजार ४५३ कोटी रुपये दिलेले नाहीत. दोन दोन हंगाम उलटूनही शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी न देण्याऱ्या यादीत उत्तर प्रदेश (१४८ कोटी रुपये), बिहार (१११ कोटी) उत्तराखंड (१४४ कोटी), गुजरात (३६ कोटी), महाराष्ट्र (३७५ कोटी) अशी नावे आहेत.

गुजरातने थकविली सर्वाधिक एफआरपी

देशात यंदा १४ राज्यांमधील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून उसाची खरेदी केली. खरेदीपोटी एक लाख १८ हजार ८९ कोटी रुपये एफआरपी देण्याचे बंधन या कारखान्यांवर होते. त्यापैकी आतापर्यंत ९४.५ टक्के रक्कम म्हणजेच एक लाख ११ हजार ३३२ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. अर्थात, हंगाम संपला तरी ११ राज्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी दिलेली नाही. एकूण सहा हजार ७५७ कोटी रुपयांची एफआरपी देशभर अजूनही देण्यात आलेली नाही. त्यात सर्वाधिक थकीत एफआरपी गुजरातची आहे.

‘गुजरातप्रमाणे भाव द्या’

‘‘गुजरात पॅटर्न चांगला आहे. कारण गेल्या हंगामात तेथील शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन ४७०० रुपये भाव मिळाला आहे. तसेच ८.५ टक्के उताऱ्याला तेथे ३०३२ रुपये भाव मिळतो आहे. भाव चांगला दिल्यास तुकड्याने एफआरपी घेण्यास आम्हीदेखील तयार आहोत. पण, भाव कमी द्यायचे आणि एफआरपीचे तुकडेही करायचे ही दुहेरी लूट आहे,” अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com