Weather Update : पावसाच्या उघडिपीने उन्हाचा चटका, उकाड्यात वाढ

पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon
Published on
Updated on

पुणे : पावसाने (Rainfall) उघडीप दिल्याने उन्हाचा चटका (Temperature) आणि उकाड्यात (Heat) वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २७) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning) आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Weather Update
Rain : जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंब

वायव्य राजस्थान आणि पाकिस्तान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा कमी दाबाच्या क्षेत्रापासून राजस्थान, सिकार, सुलतानपूर, देहरी, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. झारखंड आणि परिसरावर तसेच बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर अंतर्गत कर्नाटकपासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान असले तरी पावसाची मुख्यतः उघडीप असल्याचे चित्र आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत.

Weather Update
Monsoon Update : मॉन्सून लवकरच परतीच्या प्रवासावर

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : पोलादपूर ३०, तळा, जव्हार, ठाणे, लांजा प्रत्येकी २०.

मध्य महाराष्ट्र : लोणावळा ५०, गगनबावडा, महाबळेश्‍वर प्रत्येकी २०, इगतपुरी, वेल्हे प्रत्येकी १०.

मराठवाडा : लातूर, निलंगा प्रत्येकी १०.

विदर्भ : गोंदिया, लाखणी प्रत्येकी २०, गोरेगाव, गोंदिया, सडक अर्जुनी, चिमूर, आमगाव, मेहकर प्रत्येकी १०.

घाटमाथा : कोयना पोफळी, डुंगुरवाडी प्रत्येकी ५०, लोणावळा, शिरगाव, ताम्हिणी प्रत्येकी ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com