Malegaon Yatra : कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कारांचे वितरण

माळेगाव येथील यात्रेत कृषी व बचत गट प्रदर्शनात शेतकरी व यात्रेकरूंचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. २२) झाले. यामध्ये शेती विषयक अत्याधुनिक अवजारे व शेतीचे अनेक उत्पादने ठेवण्यात आली आहेत.
Malegaon Yatra
Malegaon YatraAgrowon

नांदेड : माळेगाव येथील यात्रेत (Malegaon Yatra) कृषी व बचत गट प्रदर्शनात शेतकरी व यात्रेकरूंचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनाचे (Agriculture Exhibition) उद्‌घाटन गुरुवारी (ता. २२) झाले. यामध्ये शेती विषयक अत्याधुनिक अवजारे (Modern Implements) व शेतीचे अनेक उत्पादने ठेवण्यात आली आहेत. शिवाय यावर्षी देशी वाणाचे बियाणे व सेंद्रिय शेती मॉडेल प्रदर्शन भरवले आहे.

Malegaon Yatra
Malegaon Yatra : माळेगावची खंडोबाची यात्रा आजपासून सुरू

प्रगतिशील शेतीसाठी आवश्यक असणारी वेगवेगळी शेतीची अवजारे, कीटकनाशके खते बियाणे या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. ज्यामुळे नवनवीन माहिती शेतकऱ्यांना मिळून शेतीच्या नवनवीन प्रयोगासाठी फायदा होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या प्रदर्शनात सॅन्ड फिल्टर, ब्रश कटर, कृषी ट्रॅक्टर अशी तंत्राज्ञान असलेल्या अवजारे अनेक प्रकारच्या फवारण्या व त्यांची माहिती या ठिकाणी ठेवण्यात आली आहे.

Malegaon Yatra
Malegaon Yatra : माळेगाव यात्रेला प्रारंभ ; कृषी प्रदर्शन, विविध स्टॉलचे उद्घाटन

कृषी प्रदर्शनाबरोबरच बचत गट प्रदर्शनासाठी या ठिकाणी स्टॉलच्या आरक्षण करण्यात आले आहे जिल्हाभरातून या ठिकाणी अनेक बचत गटांनी वेगवेगळ्या वस्तूंच्या हजेरी लावली आहे. या ठिकाणी बचत गटांनी खाद्यपदार्थासह हस्तकला चित्र, घोंगडी, परड्या, टोपल्या अनेक वस्तू प्रदर्शनासाठी व विक्रीसाठी आणले आहेत. या वेळी प्रदर्शनास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कृषी प्रदर्शनामुळे अत्याधुनिक शेती कशी करायची कमी पाण्यामध्ये व कमी जमिनीत उत्पन्न कसे घ्यायचे याचे ज्ञान प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना होत आहे. पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेकडून देण्यात येणाऱ्या कृषिनिष्ठ पुरस्काराचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण (२०२१-२०२२)

ज्ञानोबा शेषराव कोंके, काकांडी नांदेड, रुस्तुम अमृता मुंगल, इजळी (मुदखेड), विश्वनाथ मारोती गव्हाणे, कलदगाव (अर्धापूर), हरिदास दिगंबर वंचेवाड, शिरूर (उमरी), शंकर किसन सुरोशे, बामणी फाटा (हदगाव), लिंगा रामजी कुमरे वरगुडा (किनवट), पुंडलिक पोशेट्टी पुजरवाड, ढरत्नाळी (धर्माबाद), माधवराव व्यंकटराव जाधव, कुशावाडी (देगलूर), बालाजी भीमराव गीते, वंजारवाडी (कंधार), बाबाराव लक्ष्मण चौधरी, पडसा (माहूर), बाबुराव संभाजी पवार, जवळगाव (हिमायतनगर), बालाजी हणमंतराव बिलवंड, नरसी (नायगाव(, दिगंबर विठ्ठलराव जाधव, चिवळी (मुखेड), भूमाजी संभाजी टाकळे, लघळुद (भोकर), रत्नाकर गंगाधर ढगे, सायाळ (लोहा), कृष्णा बालाजी चरकुलवार, कासराळी (बिलोली),

२०२२-२३ मधील कृषिनिष्ठ शेतकरी

नारायण देवराव कदम, खडकी (नांदेड), विठ्ठल नारायण लष्करे, वासरी (मुदखेड), परमेश्वर फुलाजी जंगीलवाड, चेनापूर (अर्धापूर), साईनाथ बाबुराव पुपुलवाड, तळेगाव (उमरी), सुरेशराव शंकरराव सूर्यवंशी, धोतरा (हदगाव), विजय कोंडबा मडावी, वजरा बु. (किनवट), गंगाधर तुकाराम कंधारे, बाचेगाव (धर्माबाद), नारायण व्यंकटराव पाटील, काठेवाडी (देगलूर), प्रशांत शंकरराव मोरे, आलेगाव (कंधार), जयकिशोर अंबादास क्षीरसागर, मालवाडा (माहूर), सुनीता कैलास माने, पोटा बु. (हिमायतनगर), हनुमंतराव नागोराव भोसले, हिप्परगा (नायगाव), बालाजी अशोकराव ठोसणे, कबनूर (मुखेड), सतीश रामराव देशमुख, नागापूर (भोकर), विश्वनाथ गोविंद कोळगे, दापशेड (लोहा), कमलकिशोर शेटीबा जाधव, पाचपिंपळी (बिलोली) या सर्व ३२ शेतकऱ्यांचा माळेगाव येथील कृषी प्रदर्शनात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात स्मृतिचिन्ह, शाल, फेटा व प्रमाणपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com