Malegaon Yatra : माळेगावची खंडोबाची यात्रा आजपासून सुरू

दक्षिण भारतात प्रसिद्ध; पालखीने होणार सुरूवात
 Malegaon Yatra
Malegaon Yatra Agrowon

कृष्णा जोमेगावकर : ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव (ता. लोहा) येथील खंडोबा यात्रा आजपासून (ता. २२) सुरू होईल. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्गामुळे यात्रेचे मोठ्या प्रमाणात आयोजन झाले नव्हते. यंदा मात्र मोठ्या उत्साहात यात्रा होईल. त्यामुळे जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे.

 Malegaon Yatra
Malegaon Sugar : सहवीज निर्मितीतून माळेगाव कारखान्याला दीड कोटींचा फायदा

जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती आणि माळेगाव ग्रामपंचायती च्यावतीने पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी देखील नुकतीच माळेगाव येथे भेट देऊन यात्रेच्या नियोजनाची पाहणी केली. आज (ता. २२) श्री खंडेरायाची शासकीय पूजा होऊन पालखी निघेल. त्याचबरोबर कृषी प्रदर्शन आणि विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात येईल. उद्या (ता. २३) अश्व, श्वान, शेळी व कुक्कुट प्रदर्शन देखील होईल.

 Malegaon Yatra
Nadi Sanvad Yatra : नदी संवाद यात्रा लोकचळवळ व्हावी: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

अश्व आणि श्वान पालकांनी सोबत बँक पासबुक आणि आधार कार्डची छायांकित प्रत आणणे अनिवार्य आहे. शनिवारी (ता. २४) कुस्त्यांची स्पर्धा होईल. त्याचबरोबर अश्व, श्वान, शेळी व कुक्कुट प्रदर्शनातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात येतील. रविवारी (ता. २५) लावणी महोत्सव होईल. सोमवारी (ता. २६) पारंपरिक कला महोत्सव आणि विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण होईल. या यात्रेला राज्यासह तेलंगणा, कर्नाटक, आंध प्रदेश, गुजरात आदी राज्यांतून भाविक, व्यापारी येतात. त्यामुळे एस. टी. महामंडळाच्या वतीनेही बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर विशेष पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

----
चौकट ः
‘लम्पी स्कीन’मुळे पशुधन प्रदर्शनाला बंदी
माळेगाव यात्रेत दरवर्षी पशुधनाचे प्रदर्शन भरविण्यात येते. यात लालकंधारी, देवणी, खिल्लार आदी गायवर्गातील जातिवंत पशुधन येतात. यंदा राज्यात लम्पी स्कीनमुळे जिल्हा प्रशासनाने माळेगाव यात्रेत पशुधनाला बंदी घातली आहे. जिल्ह्यात १२४४ गावातील ५६२८ पशुधन या आजाराने बाधित झाली आहेत. तर ३५४ जनावरांचा मृत्यू झाल्याचे आदेशात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com