
Sangli News : जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार १७० शेतकऱ्यांना सुमारे ११७४ कोटी ९६ लाखांचे खरीप हंगामातील पीक कर्जवाटप केले आहे. खरीप हंगामाचा दीड महिना उलटला आहे. त्यामुळे उशिराने प्रस्ताव सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जिल्हा बॅंकचे ९७५ कोटी ६८ लाख, राष्ट्रीय बॅंक ४६५ कोटी ७५ लाख तर खासगी बॅंक ३०१ कोटी ६५ लाख असे एकूण पिक कर्जाचे उद्दिष्ट १७४३ कोटी ८ लाख आहे.
खरीप हंगामातील पिकांच्या कर्जासाठी कागदपत्रांची पूर्तता करून बॅंकांकडे सादर केले. बँका, सोसायट्या, राष्ट्रीय बँकांतर्फे कर्जाची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठ्यासाठी बॅंकांनी कर्जही देण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा बॅंकेने जुलैअखेर १ लाख १२ हजार ९४५ शेतकऱ्यांना ९०२ कोटी ७३ लाख कर्ज वितरण केले आहे. राष्ट्रीय बॅंकांनी १० हजार ९०७ शेतकऱ्यांना १९८ कोटी ६२ लाख तर खासगी बॅंकांनी ३ हजार ३१८ शेतकऱ्यांना ७३ कोटी ६१ लाखाचे कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीय आणि खासगी बॅंकाकडून कर्जवाटपाचे प्रमाण कमी आहे.
जिल्हा बॅंक आघाडीवर आहे. परंतु यंदाच्या खरीप हंगामात पाऊस उशिरा सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी उशिरा सुरू केली. त्यामुळे हंगाम लांबणीवर पडला. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात विलंबाने पीक कर्जासाठी सादर प्रस्ताव करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जाणार का, अशी चर्चा शेतकऱ्यांच्यात सुरू झाली आहे.
खरीप हंगामातील पीक कर्जाचे उद्दिष्ट (कोटींत)
जिल्हा बॅंक ९७५ कोटी ८८
राष्ट्रीय बॅंका ४६५ कोटी ७५
खासगी बॅंका ३०१ कोटी ६५
एकूण १७४३ कोटी ०८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.