Crop Loan : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा.. ; तेलगंणा सरकारच्या निर्णयानंतर बीआरएसची मागणी

Telangana Government : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील शेतकऱ्यांची १९ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. या निर्णयाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
BRS Worker
BRS WorkerAgrowon
Published on
Updated on

Farmer Loan Waiver Scheme : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल महाराष्ट्रातील बीआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत ठिकठिकाणी पेढे वाटून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला. अशाच प्रकारे महाराष्ट्रात कर्जमाफी करावी, अशी मागणी बीआरएसकडून करण्यात आली.
 

BRS Worker
Raghunath Dada Patil : रघुनाथदादा पाटील भारत राष्ट्र समितीत दाखल

दोन दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ३ ऑगस्टपासून शेतकरी कर्जमाफी कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना आधीच देण्यात आलेल्या कर्जमाफीसोबतच आणखी १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रयथू बंधूप्रमाणे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम महिन्याच्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री केसीआर यांनी दिले आहेत.

तेलंगणातील राज्यातील शेतकरी कर्जमाफीमुळे महाराष्ट्रातील बीआरएस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तेलंगणातील कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड येथे पेढे वाटून, फटाके फटाके उडवून आनंदोत्सव साजरा केला. तेलंगणा राज्यातील सरकार हे करु शकते तर महाराष्ट्र सरकार हे का नाही करु शकत ? ही भूमिका मांडून जोरदार घोषणाबाजी केली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com