Crop Loan : पीक कर्जवाटप ६० टक्केच

Agriculture Credit : खानदेशात पीक कर्जवाटपाचा लक्ष्यांक मोठा आहे. पण बँका हा निधी शेतकऱ्यांना देण्यास जोखमेची बाब म्हणून टाळत आहेत.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात पीक कर्जवाटपाचा लक्ष्यांक मोठा आहे. पण बँका हा निधी शेतकऱ्यांना देण्यास जोखमेची बाब म्हणून टाळत आहेत. अनेक नवे पीककर्ज प्रस्ताव बँकांमध्ये पडून आहेत. प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी शेतकरी बँकांमध्ये चकरा मारीत आहेत. सुमारे ६० टक्केच पीक कर्जवाटप झाले आहे.

जळगाव जिल्हा बँकेला सुमारे ९०० कोटी रुपये पीककर्ज वितरण करायचे होते, पण बँकेने यापेक्षा अधिकचे पीककर्ज दिले आहे. यातील पात्र शेतकऱ्यांना एप्रिलमध्येच कमाल कर्जाचे वितरण झाल्याची माहिती आहे. तर धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेला सुमारे २३० कोटी रुपये पीककर्ज वितरण करायचे आहे. या बँकेनेही ६० टक्के पीककर्ज वितरण केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज वितरण धीम्या गतीने सुरू आहे.

Crop Loan
Crop Loan : कपाशी, तूर, मूग, ऊस पिकाच्या कर्जदारात वाढ

हे कर्ज वितरण करताना दिरंगाई होत आहे. शिवाय नवे प्रस्ताव मार्गी लावले जात नसल्याची स्थिती आहे. अनेक शाखांमध्ये शेतकरी चकरा मारीत आहेत. ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या कमी आहे. पाच ते सहा गावांसाठी एकाच बँकेची शाखा व त्यात चार-पाच कर्मचारी अशी स्थिती आहे. यामुळेदेखील कर्ज वितरण, प्रस्तावाची कार्यवाही वेगात होत नाही, अशी स्थिती आहे.

Crop Loan
Crop Loan : खरिपासाठी मुदतीत पीककर्जाचे वितरण करा

पीककर्जाचा निधी बँका उभा करतात. शासनाकडून बँकांना काहीच मदत, निधी, अनुदान मिळत नाही. शासन फक्त कर्ज वितरण लक्ष्यांक जाहीर करते, पुढे बँकांना हा निधी उभा करावा लागतो. राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज वितरण व वसुली वर्षभर सुरू असते.

यामुळे देखील कर्ज वितरण लक्ष्यांकाच्या तुलनेत कमीच दिसते, असा दावाही काही अधिकारी करीत आहेत. अशात प्रशासनाने मात्र पीककर्जाबाबत कुठल्याही आढावा बैठका, सूचना दिलेल्या नाहीत. यामुळे बँकांचे प्रशासन काही भागांत मनमानी करते, असा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.

कर्ज वितरण स्थिती अशी...

खानदेशात सुमारे २५०० कोटी रुपये पीककर्ज वितरण लक्ष्यांक आहे. यात एकट्या जळगाव जिल्ह्यात २००० कोटी रुपये वितरण अपेक्षित आहेत. तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे ५०० कोटी रुपये पीककर्ज वितरण करायचे आहे. परंतु यातील ६० टक्केही पीककर्ज वितरण झालेले नाही.

जळगाव जिल्हा बँक व धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेने मात्र पीककर्ज वितरणात आघाडी घेतली. जळगाव जिल्हा बँकेने यंदा ११० टक्क्यांपर्यंतची मजल पीक कर्जवाटपात गाठली आहे. मागील वर्षी घेतलेली या बँकेची पीक कर्जवाटपातील आघाडी कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com