Millet Seed Kit : तृणधान्याचे २९ लाख मिनीकीट बियाणे शेतकऱ्यांना वितरण

Millet Year : जागतिक तृणधान्य वर्ष साजरे करताना तृणधान्याचे क्षेत्र वाढावे यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
Millet Crop
Millet CropAgrowon
Published on
Updated on

Nagar News : जागतिक तृणधान्य वर्ष साजरे करताना तृणधान्याचे क्षेत्र वाढावे यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्वारी, बाजरी, राळा, राजगिरा, नाचणी, कोदो या तृणधान्याचे क्षेत्र वाढावे आणि पुढील वर्षासाठी बियाणे उपलब्ध व्हावे म्हणून शेत तेथे पौष्टिक तृणधान्य मोहिमे अंतर्गत मोहिमेतून यंदा राज्यात २७ लाख ९० हजार तृणधान्याच्या मिनीकीट बियाणांचे खरिपासाठी वाटप केले जात आहे. या बियाणांवर शासन साडेसात कोटी खर्च करत आहे.

या बियाणांतून दोन लाख हेक्टरपर्यंत क्षेत्रावर तृणधान्याची पेरणी होणार आहे. याशिवाय पाचही बियाणांचे एकत्रित असलेले मिलेट श्रीअन्न कॅफेटेरिया अंतर्गतची एक लाख मिनीकीट बियाणांचे वाटप केले जात आहे. या उपक्रमातून पुढील वर्षासाठी तृणधान्याची मुबलक बियाणे उपलब्ध होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Millet Crop
Millet Production : चांगला परतावा मिळाल्यास भरडधान्य उत्पादन वाढेल

मिनीकिटसोबत पाचही बियाणांचे एकत्रित असलेले मिलेट श्रीअन्न कॅफेटेरिया अंतर्गतची एक लाख मिनीकीट बियाणांचे वाटप केले जात आहे. या एका पाकिटातून प्रत्येकी एक गुंठा क्षेत्रावर पेरणी करता येणार आहे.

मिनिकीट बियाणांवर साडेसात कोटी रुपये तर पाचही बियाणांचे एकत्रित असलेले मिलेट श्रीअन्न कॅफेटेरिया अंतर्गत पाकिटावर ७१ लाखांचा खर्च होणार आहे. या उपक्रमातून पुढील वर्षी मुबलक बियाणे उपलब्ध होतील आणि त्यामुळे तृणधान्याचे क्षेत्र वाढेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Millet Crop
Foxtail Millet Crop : आपत्कालीन परिस्थितीत खरिपात राळ्याचे पीक ठरू शकते फायदेशीर

पीकनिहाय मिनिकीट

- खरीप ज्वारी ः ७ लाख २० हजार

- बाजरी ः ९ लाख

- नाचणी ः ३ लाख ६० हजार

- राळा ः ३ लाख ६० हजार

- कोदो ः १ लाख ८० हजार

- राजगिरा ः २ लाख ७० हजार

जिल्हानिहाय मिनीकीट वाटप

ठाणे : १,१४,८३, पालघर : ३२,४४६, रायगड ः १३,१३०, रत्नागिरी : ४९,०८०, सिंधुदुर्ग : २५,२९३, नाशिक : १,२७,९९०, धुळे : ६८,७६०, नंदुरबार : ४२,१९०, जळगाव ; १,४३,५९८, नगर : ६५,५६०, पुणे : १९,२१०, सोलापूर : ३५,१५०, सातारा : ४१,४९०, सांगली ः १४,४३०, कोल्हापूर ः ९१,६७०, औरंगाबाद ः १,१६,०४०, जालना ः १,३१,२४०, बीड ः १,६६,४८०, लातूर ः १,४०,९२०, उस्मानाबाद ः ९९,१८०, नांदेड ः १,७३,५७९, परभणी ः १,२७,९२०, हिंगोली ः ८९,२८०, बुलडाणा ः १,७२,३००, अकोला ः १,०७,२३०,, वाशीम ः ९८,१८०, अमरावती ः १,६३,९१०, यवतमाळ ः १,२८,४००, वर्धा ः १,०७,१६०, नागपूर ः ९७,६८०, भंडारा ः ३३,४३५, गोदिंया ः २,५१०, चंद्रपूर ः ४५,४२५, गडचिरोली ः ७,१५०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com