Millet Production : चांगला परतावा मिळाल्यास भरडधान्य उत्पादन वाढेल

Millet Year : दोन दशकांपूर्वी पौष्टिक भरडधान्यांच्या उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर होता. परंतु आता भरडधान्याचा पेरा चिंता वाटावी इतका घटला आहे.
Millet Production
Millet ProductionAgrowon

Pune News : ‘‘दोन दशकांपूर्वी पौष्टिक भरडधान्यांच्या उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर होता. परंतु आता भरडधान्याचा पेरा चिंता वाटावी इतका घटला आहे. मात्र मूल्यसाखळीचा विकास व शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळाल्यास पेरा वाढू शकतो,’’ असा विश्‍वास राज्याच्या कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांनी व्यक्त केला.

‘महाराष्ट्र मिलेट मिशन’च्या वाटचालीची दिशा ठरविण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स आणि महाराष्ट्र रिव्हायटलायजिंग रेनफेड ॲग्रिकल्चर नेटवर्क (महा-आरआरएएन) यांनी संयुक्तपणे शनिवारी (ता. २४) राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित केले होते. गोखले इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या या चर्चासत्राच्या उद्‍घाटनाच्या सत्रात अनुपकुमार यांनी दूरदृश्‍यप्रणालीच्या माध्यमातून सहभाग घेतला.

Millet Production
Millet Year : मिलेट वर्षात केवळ प्रसिद्धीचा गाजावाजा

या वेळी इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्चचे डॉ. श्रीजित मिश्रा, प्रगती अभियानाच्या आश्‍विनी कुलकर्णी, आरआरए नेटवर्कचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. सब्यासाची दास, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख उपस्थित होते. तर कृषी आयुक्त सुनील चव्हाण दूरदृश्‍यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

‘‘विविध भरडधान्यांचे पदार्थ तयार करून आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरे करण्यावर भर दिला जात आहे. परंतु शेतकऱ्यांनी भरडधान्यांचे उत्पादन वाढवावे, यासाठी ठोस काम होण्याची आवश्यकता आहे. ही बॅकवर्ड लिंकेज विकसित झाली नाही, तर भरडधान्य वर्ष साजरे करणे हे केवळ प्रतिकात्मक आणि वरवरचे ठरेल,’’ असे अनुपकुमार म्हणाले.

‘‘पौष्टिक भरडधान्य उत्पादन ही राज्याची मूळ शेती व अन्न संस्कृती होती. शेतकऱ्यांना योग्य दाम मिळाल्यास ते भरडधान्यांचा पेरा आपोआप वाढवतील. या पिकांची मूल्यसाखळी पूर्णतः विस्कळीत झालेली आहे. ती पूर्वपदावर आणावी लागेल. मागणी व पुरवठ्याचा समतोल साधणारी विपणन साखळी विकसित करावी लागेल,’’ असे अनुपकुमार यांनी सांगितले.

‘‘भारतामुळेच आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष जाहीर झाले आहे. पाश्‍चिमात्य देशांमध्ये भरडधान्य मागणी वाढते आहे. पुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी शेत ते स्वयंपाक घर (फार्म टू फोर्क) ही साखळी विकसित करावी लागेल,’’ असे डॉ. रानडे म्हणाले.

Millet Production
Millet Cultivation Techniques : भरडधान्यांसाठी शून्य मशागत तंत्र फायदेशीर

‘‘मिलेट मिशन यशस्वी झाल्यास राज्याच्या कोरडवाहू, अवर्षणग्रस्त भागाचा विकास होईल; तसेच राज्याचे अन्न पोषण आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची समस्यादेखील हाताळली जाईल,’’ असे डॉ. दास यांनी सांगितले. कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘शेतकऱ्यांकडे अजूनही भरडधान्याची ९ प्रकारची पारंपरिक बियाणे आहेत. त्यांना बाजारभाव, बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास शेतकरी पुन्हा भरडधान्य उत्पादनाकडे वळू शकतात.’’

‘शेतकरी हुशार; पण त्याला परतावा द्या’

डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील शेतकरी हुशार आहे. त्यांना भरडधन्याचे उत्पादन कसे वाढवायचे, हे चांगले ठाऊक आहे. पण भाव मिळत नसल्याने ते फळबागा आणि इतर पिकांकडे वळले. त्यामुळे चांगला बाजारभाव आणि गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिल्यास भरडधान्याचे क्षेत्र झपाट्याने वाढू शकते.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com