Hatnur Dam : हतनूर धरणातून विसर्ग घटला

Hatnur Dam Water Level : खानदेशात ६ जुलैनंतर पाऊस आला. परिणामी अनेक तालुक्यांतील सिंचन प्रकल्पांत कमी जलसाठा आहे.
Hatnoor Dam Jalgaon
Hatnoor Dam JalgaonAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात ६ जुलैनंतर पाऊस आला. परिणामी अनेक तालुक्यांतील सिंचन प्रकल्पांत कमी जलसाठा आहे. परंतु तापी नदीवरील हतनूर (ता. भुसावळ) येथील प्रकल्पात पाण्याची सतत आवक सुरू आहे. प्रकल्पातून विसर्ग सध्या कमी झाला असून, त्याचे सहा दरवाजे सध्या उघडे असल्याची माहिती आहे.

खानदेशात काही भागात सिंचन प्रकल्प भरले आहेत. यात रावेरातील मंगरूळ, अभोरा, सुकी, यावलमधील मोर, गारबर्डी लघू प्रकल्पाचा समावेश आहे. तर हतनूर धरणातही तापी नदीच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक सतत कायम आहे. मध्यंतरी त्याचे सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले होते.

Hatnoor Dam Jalgaon
Hatnoor Dam : हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

मागील २६ ते २७ दिवसांपासून हतरनूरमधून विसर्ग सुरूच आहे. हा विसर्ग पाण्याच्या आवकेनुसार कमी व अधिक होत आहे. त्याचा जलसाठा नियंत्रित करण्यासाठी हा विसर्ग केला जातो. त्यात जलसाठा २२ ते ५६ टक्के एवढा राखला जात आहे. हतनूरचे सहा दरवाजे शुक्रवारी (ता.४) उघडे होते.

Hatnoor Dam Jalgaon
Hatnoor Dam : जळगावकर सावधान! हतनूर धरणाचे १० दरवाजे उघडले

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे गिरणा धरण (१८ टीएमसी साठा क्षमता), वाघूर (ता.जामनेर) धरणातही जलसाठा कमी आहे. गिरणातील जलसाठा ३४ टक्क्यांपर्यंत आहे. वाघूरमधील जलसाठाही सध्या ५० टक्क्यांखाली आहे.

धुळ्यातील मालनगाव, सोनवद, अमरावती, बुराई या मध्यम प्रकल्पातील जलसाठादेखील ३० टक्क्यांखालीच आहे. अनेर (ता.शिरपूर) धरणात जलसाठा बऱ्यापैकी आहे. तसेच पांझरा प्रकल्प याच आठवड्यात पूर्ण भरला आहे. नंदुरबारमधील सुसरी प्रकल्पातील जलसाठा वाढला आहे. तसेच दरा, देहली प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com