Hatnoor Dam : हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
Jalgaon News : जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) व गुरुवारी (ता. ६) अनेक भागात जोरदार व मध्यम पाऊस झाला आहे. पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. यातच गुरुवारी पावसाने रावेर तालुक्यात झोडपले.
रावेरमधील सर्वच मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली असून. तापी नदीवरील भुसावळनजीकच्या (जि. जळगाव) हतनूर धरणातील पाणीसाठा वाढून धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी अर्ध्या मीटरने गुरुवारी उघडण्यात आले आहेत.
जळगाव जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाचा पत्ता नव्हता. मॉन्सून राज्यात सक्रिय होऊनही जळगाव जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले नव्हते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले. बुधवारी (ता. ५) व गुरुवारी (ता. ६) जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस झाला.
मात्र गुरुवारी पावसाने कहर केला. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसामुळे तापी, पूर्णा नद्यांना पूर आला. त्यामुळे हतनूरचा पाणीसाठा वाढून या धरणाचे गुरुवारी (ता. ६) ४ दरवाजे प्रत्येकी अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. त्यातून ४ हजारांहून अधिक क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु होता.
रावेर तालुक्यात मुसळधार
रावेर तालुक्यात बुधवारी रात्री अचानक पावसाचा जोर वाढला. काही वेळातच ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना प्रचंड पूर आला. मूळ रावेर शहरात पाऊस कमी असला तरी सातपुड्यात प्रचंड पाऊस झाल्याने त्याचा परिणाम संपूर्ण तालुक्यावर झाला. रावेर तालुक्यातील सातही मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
रावेरातील गुरुवारचा (ता. ६)
पाऊस असा (मि. मी.)
मंडल पाऊस
रावेर ११८.८
खिरोदा ९१.३
खानापूर ९०.५
सावदा ९९.३
खिर्डी ७२
निंभोरा ५३.५
ऐनपूर ८५.२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.