Milk Rate Difference : दूध उत्पादकांना तब्बल २३ लाखांचा दिला फरक, म्हैशीला १४ रुपये फरक

Kolhapur Milk : कोल्हापूर जिल्ह्यात हजारो लीटर दूध संकलन करणाऱ्या संस्था असल्याने शेतकऱ्यांना भरघोस फरक बिले दिली जातात.
Milk Rate Difference
Milk Rate Differenceagrowon
Published on
Updated on

Milk Rate : कोल्हापूर जिल्ह्यात हजारो लीटर दूध संकलन करणाऱ्या संस्था असल्याने शेतकऱ्यांना भरघोस फरक बिले दिली जातात. दरम्यान नानीबाई चिखलीमधील एका दूध संस्थेने दूध उत्पादकांना तब्बल २३ लाखांचा फरक वाटला आहे. दूध उत्पादकांच्या दूधास योग्य मोबदला मिळावा यासाठी अत्यंत काटकसरीचा कारभार करीत उच्चांकी असे फरक बील वाटपाची परंपरा येथील कै. रावसाहेब भोसले दूध संस्थेने जपली आहे.

यावर्षी संस्थेने दूध उत्पादकांना फरक बिल, दूध बिल, मेंबर ठेव यासहित विक्रमी असे २३ लाख १७ हजार रूपयांचे वाटप करीत उत्पादकांची विश्वासार्हता जपली. अवघ्या सहा वर्षापूर्वी स्थापन झालेल्या संस्थेचे दररोजचे संकलन ८०० लिटर दूध इतके आहे.

वर्षभरानंतर संस्थेने उत्पादकांना त्यांच्या घामाचा मोबदला देण्यासाठी म्हैस दूधास शेकडा रूपये १४.४५ प्रमाणे ४ लाख ८३ हजार, गाय दूधास शेकडा रूपये १४.३० टक्केप्रमाणे ८ लाख ६४ हजार, याचबरोबर संस्थेत असलेली सभासद ठेव रूपये ७ लाख ६० हजार तर आठवडा दूध बिलाचे २ लाख ८ हजार ७२२ असे एकूण २३ लाख १७ हजार रूपयांचे वाटप केले.

तसेच संस्थेला सर्वात जास्त गाय विभागामध्ये दूध पुरवठा केलेले अनुक्रमे सुनिता पिसाळ, युवराज पाटील, राजाराम कोंगनुळे तर म्हैस विभागामध्ये मेघा कुंभार, उज्वला निकम, जैतुनबी नाईक आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते चषक देत करण्यात आला.

Milk Rate Difference
Online Satbara : आता एका क्लिकवर सातबारा होणार दुरूस्त, असा करा ऑनलाईन अर्ज

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा तसेच माजी महिला व बालकल्याण सभापती शिवानी भोसले म्हणाल्या, संस्थेने अल्पावधीतच घेतेलेली झेप कौतुकास्पद अशीच आहे.

संस्थेच्या माध्यमातून उत्पादकांना योग्य किंमत, बेरोजगारांना काम मिळवून देण्यासाठी केलेली वाटचाल योग्य दिशेने असल्याचे सांगीतले. आण्णासो शिरगुप्पे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शितल नांगणुरे, कृष्णा डवरी, विवेक चाबुकस्वार, नंदकुमार चाबुकस्वार, पिंटू आरगे, युवराज कुंभार तसेच सर्व संचालक, दूध त्पादक सभासद उपस्थित होते. सचिव विजय घस्ती यांनी संस्थेचा आढावा घेतला. प्रकाश कुंभार यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com