Amravati Water Shortage : खरीप समाधानकारक, रब्बीत पाणीटंचाई

यंदा पावसाचा वर्तविण्यात आलेला अंदाज बघता खरीप हंगामात पीकस्थिती बऱ्यापैकी राहणार असली तरी फळबागा व रब्बी हंगाम मात्र अडचणीचा जाण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
Water Shortage
Water Shortage Agrowon
Published on
Updated on

Amravati News : यंदा पावसाचा वर्तविण्यात आलेला अंदाज बघता खरीप हंगामात पीकस्थिती बऱ्यापैकी राहणार असली तरी फळबागा व रब्बी हंगाम मात्र अडचणीचा जाण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

पावसाची सरासरी अपेक्षेपेक्षा थोडी कमी राहणार असली तरी कापसासाठी ती पूरक असून सोयाबीनसाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. तुरीच्या क्षेत्रात पाच टक्क्यांपर्यंच वाढ संभव आहे.

आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात ६.८१ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी प्रस्तावित आहे. कृषी विभागाने त्यासाठी बियाणे व खतांचे नियोजन केले आहे. हवामान खात्याने यावर्षी पावसाची सरासरी ९६ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला असून अन-निनोचा प्रभाव राहण्याची शक्यताही वर्तविली आहे.

Water Shortage
Maharashtra Unseasonal Rain : नांदेडमध्ये शुक्रवारपर्यंत अवकाळीचा इशारा

पावसाची सरासरी समाधानकारक राहणार असली तरी ती खंडित स्वरूपाची राहणार आहे. जुन महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पेरणीला सुरुवात होते व ती जुलैच्या पहिल्या पंधरवड्याअखेरपर्यंत चालते.

यावर्षी पावसाची सरासरी कापसाच्या पिकासाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाचे एकंदरीत वेळापत्रक बघितल्यास पेरणीनंतर सोयाबीन फुलोऱ्यावर असताना पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

अशावेळी या पिकांना धोका होणार आहे, तर तुरीला यंदा मिळालेले भाव बघता पेरणी क्षेत्रात पाच टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी वर्तविली.

खरीप हंगाम बऱ्यापैकी व समाधानकारक राहणार असला तरी फळबागा व रब्बीसाठी तो अडचणीचा ठरू शकणार आहे. रब्बी हंगामात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. या हंगामात हरभरा व गहू ही प्रमुख पिके असून सिंचनाची आवश्यकता अधिक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com