Maharashtra Water Shortage : राज्यात पाणीपुरवठ्यासाठी धावताहेत १०१ टॅंकर, पाणीटंचाईच्या झळा

उन्हाच्या झळा वाढल्याने पाणी टंचाई तीव्र होऊ लागली आहे. मराठवाडा आणि नागपूर विभाग वगळता सर्वच विभागांत टॅंकरने पाणी पुरवठा करण्यास सुरवात झाली आहे.
Water Shortage
Water ShortageAagrowon
Published on
Updated on

Pune News : उन्हाच्या झळा वाढल्याने पाणी टंचाई (Water Shortage) तीव्र होऊ लागली आहे. मराठवाडा आणि नागपूर विभाग वगळता सर्वच विभागांत टॅंकरने पाणी पुरवठा (Water Supply in Tanker) करण्यास सुरवात झाली आहे. सध्या राज्यातील १११ गावे व २५९ वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठ्यासाठी १०१ टॅंकर धावत आहेत.

येत्या काळातील टंचाईची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.

हवामान विभागाने पावसाचा ९६ टक्के अंदाज वर्तविल्याने शासन पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले आहे. त्यामुळे शासनाने आगामी काळातील पाणी टंचाईचे संकट लक्षात घेऊन प्रशासनाला टंचाईचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभागानेही नागरिकांना पाणी कमी वापरण्यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत.

Water Shortage
Water Shortage In Sangli : दुष्काळी पट्ट्यात पाणी टंचाई भासणार

गेल्या वर्षी पावसाळ्यात काही ठिकाणी कमी झालेला पाऊस व अधिक पाण्याचा उपसा यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट उभे राहू लागले आहे. त्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे आवश्‍यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. २३ जानेवारीला पालघरमध्ये पहिला टॅंकर सुरू झाला.

त्यानंतर हळूहळू टँकरच्या संख्येत वाढ झाली. सध्या औरंगाबाद, नागपूर विभागांत पाणी टंचाई नसली तरी ठाणे, नाशिक, पुणे, अमरावती विभागांत पाणी टंचाई सुरू झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यातील अकरा जिल्ह्यांतील ११८ गावे आणि ३५८ वाड्या वस्त्यांवर ११३ टँकरनी पाणीपुरवठा सुरू होता. त्या तुलनेत यंदा १२ टॅंकरनी घट झाली आहे.

Water Shortage
Amravati Water Shortage : अमरावती जिल्ह्यात रब्बीत पाणीटंचाई

मागील काही वर्षांत मराठवाड्यात पाणी टंचाई चांगलीच वाढत होती. परंतु गेल्या दोन वर्षांपासून मराठवाडा, विदर्भाच्या बहुतांश भागांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. येत्या काही दिवसांत या भागात टँकर सुरू होण्याची शक्यता आहे.

ठाणे विभागात पाणी टंचाईने चांगलेच डोके वर काढले आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत पाणीटंचाई तीव्र होत आहे. या भागातील ८४ गावे व २५३ वाड्या-वस्त्यांवर ७८ टॅंकरनी पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्हानिहाय टॅंकरची स्थिती :

जिल्हा ---गावे ---वाड्या-वस्त्या ---टॅंकर संख्या

ठाणे --- ३१---१२४---३०

रायगड ---२२ ---५२---१८

रत्नागिरी---१६---२५---५

पालघर---१५---५२---२५

जळगाव---८---०---२

नगर---१---५---२

सातारा---३---१---४

अमरावती---७---०---७

बुलडाणा---६---०---६

यवतमाळ ---२---०---२

एकूण ---१११---२५९---१०१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com